Som Yag Yadnya Festival 2023 Goa
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले (एमडी आयुर्वेद)
अग्निहोत्राचे आधुनिक वैज्ञानिक प्रयोग
अग्निहोत्र व वैदिक शास्त्रावरती आधुनिक वैज्ञानिक प्रयोग व्हावे यासाठी परमसद्गुरुंनी शिवपुरी नामक वैदिक नगर वसवले. गेल्या तीन दशकांमध्ये भारतासह जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी अग्निहोत्रावरती प्रयोग केलेले आहेत.
अग्निहोत्र हा सिद्धान्त आहे -परमसद्गुरू श्री गजानन महाराज
अग्निहोत्रावरील संशोधनातून काही परीक्षणे उपलब्ध झाली आहेत.
१) अग्निहोत्राच्या वातावरणाचा मायक्रोलॉजिकल अभ्यास केल्याने असे दिसून आले की अग्निहोत्र वातावरणामध्ये टायफी, साल्मोनेला (TYPHI, SALMONELLA) इत्यादि घातक विषाणूंची वाढ होत नाही. यामुळे अग्निहोत्राद्वारे संसर्गजन्य व्याधीचा प्रसार थांबवला जाऊ शकतो.
२) दिल्ली येथील एक प्रतिष्ठीत संस्थेमध्ये केलेल्या संशोधनामध्ये असे आढळले, की अग्निहोत्राच्या नित्य आचारणामुळे ८०% लोकांमध्ये व्यसनमुक्तीचे प्रमाण दिसून आले.
३) अग्निहोत्रच्या मानस शास्त्रीय परीक्षणामधून असे सिद्ध झाले की मानवी मनामध्ये अल्फा तरंगांमध्ये वाढ (ALPHAWAVE ENHANCEMENT होऊन (BETA WAVE) बिटा तरंग कमी झाले. म्हणजेच अग्निहोत्र वातावरणामध्ये मनातील ताणतणाव सहज दूर केला जाऊ शकतो. त्याच बरोबर अनेक तणावजन्य व्याधी देखील टाळता येऊ शकतात.
४) लहान मुलांबरोबर केलेल्या अभ्यासमध्ये असे दिसून आले की अग्निहोत्र वातावरणामुळे मुलांमध्ये एकाग्रतेत वाढ झाली व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करता आला.
५) अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून झालेल्या संशोधंनामधून असे लक्षात आले आहे की...
अ] तणावजन्य उच्च रक्तदाबामध्ये ४०% नी घट झाली. ब] तणावजन्य रक्त, रक्त शर्करा स्तरामध्ये ३०% नी घट दिसून आली. क] हृदयाचे ठोके (हार्ट रेट) नियमित झाले. ड] श्वसनाचा स्तर नियमित झाला.
६) कृषि तज्ञांनी केलेल्या परीक्षणामध्ये अग्निहोत्र कृषि पद्धतीमुळे जमिनीतील नायट्रोजन स्तरा (NITROGEN FIXATION) मध्ये वाढ होऊन जमिनीमधील चांगल्या जिवाणूं (GOOD BACTERIA) मध्ये देखील वाढ झाली. यामुळे जमिनीची सुपीकता वाढली तसेच अग्निहोत्र वातावरणामध्ये उगवण दर (RATE OF GERMINATION) वाढला रोगांचा प्रादुर्भाव टाळता आला व या कारणांमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली.
७) पर्यावरण क्षेत्रातला संशोधनात असे दिसले की, अग्निहोत्र वातावरणामध्ये
अ] ऑक्सीजन व ओझोन चे प्रमाण १०% नी वाढले.
ब] CO2 व SO2 चे प्रमाण २०% नी घटले.
क] एसपीएम ची मात्रा कमी झाली. ड] हवेतील आर्द्रता वाढली.
८) किरणोत्सर्गाच्या परीक्षणामध्ये असे दिसून आले, की अग्निहोत्र भस्मामुळे अन्न पदार्थ संपूर्णपणे किरणोत्सर्ग मुक्त (RADIATION FREE) करता येऊ शकतात.
९) मातीवरती केलेल्या प्रयोगांमध्ये असे दिसले, की मानवाला घातक असलेल्या जमिनीतील विषाणूंचा ऱ्हास झाला.
१०) पाण्यावरती केलेल्या संशोधनामध्ये असे आढळले, की भस्मामुळे आम्लीय (HIGH ACIDIC) पीएच पाणी (ALKALINE) अल्कलाईन झाले म्हणजेच पिण्यास योग्य झाले. त्याच बरोबर पाण्यातील रोग उत्पादक विषाणूंमध्ये घट झाली.
ही सर्व परीक्षणे अजून खूप प्राथमिक पातळीवर केलेली आहेत. अजून बरेच संशोधन होण्याची गरज असून अधिक ठोस माहिती मिळवण्याची आवश्यकता आहे.
ह्या सर्व परीक्षणांमधून असे दिसून येते, की अग्निहोत्राच्या नित्य आचरणामुळे पर्यावरण समतोल साधता येतो, प्रदूषणाचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते, उत्तम कृषि करता येते, ताणतणाव कमी होतो, शारीरिक आरोग्य चांगले होण्यास मदत होते व मुलांवर चांगले संस्कार करता येतात. जसे योग आहे, तसेच अग्निहोत्राचे सर्वांगिण फायदे असल्यामुळे अग्निहोत्र एक अत्यंत जीवनावश्यक तत्व बनले आहे. हे प्राचीन व आधुनिक दोन्हीही शास्त्रांच्या अभ्यासक विचारवंत व शास्त्रज्ञांचे मत आहे. आज जगभरामधील ६५ हून अधिक देशामध्ये हजारो लोक नित्य अग्निहोत्र करतात. शिवपुरीच्या विश्व फाऊंडेशन या संस्थेमार्फत जगभरामध्ये अग्निहोत्राच्या प्रचार प्रसाराचे व त्यावर आधारित संशोधनाचे कार्य सुरू आहे.
(लेखक हे गुरुमंदिर,बाळाप्पा मठ, अक्कलकोट व विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच श्री गजानन महाराज, शिवपुरी,अक्कलकोट यांचे नातू आहेत)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.