Fly 91 Dainik Gomantak
गोवा

Solapur Goa Flight:...आता सोलापूरातून गोव्यासाठी थेट विमानसेवा; एक तासांत पूर्ण होणार प्रवास

Flights To Goa: सोलापूर ते गोवा हे अंतर अवघ्या एका तासांत गाठता येणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

Pramod Yadav

Solapur Goa Flight

पणजी: महाराष्ट्रातील अनेक शहरातून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु होत आहे. यामध्ये आता आणखी एका शहराची भर पडली असून, आता सोलापुरातून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु होणार आहे. मूळ गोव्याची असणारी विमान कंपनी फ्लाय - ९१ यांनी या विमानसेवेची घोषणा केली आहे.

फ्लाय - ९१ ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांची गोव्यासोबत थेट कनेक्टीव्हिटीसाठी प्रयत्नशील आहे. सुरुवातीला पुणे, जळगाव यासारख्या शहरांतून विमानसेवेची घोषणा केल्यानंतर आता कंपनीने सोलापूर - गोवा थेट विमानसेवेची घोषणा केली आहे.

सोलापूर - गोवा विमान उड्डाण वेळापत्रक (Solapur Goa Flight Time Table)

सोलापूर - गोवा दुपारी ०२:१५ वाजता (दु. ०३:१५ गोवा आगमन)

गोवा - सोलापूर सकाळी ०८:१० वाजता (स. ०९:१० सोलापूर आगमन)

सोलापूर - मुंबई विमान उड्डाण वेळापत्रक (Solapur Mumbai Flight Time Table)

सोलापूर - मुंबई सकाळी ०९:४० वाजता (स. १०:४० मुंबई आगमन)

मुंबई - सोलापूर दुपारी १२:४५ वाजता (दु. ०१:४५ सोलापूर आगमन)

केव्हा सुरु होणार विमानसेवा, तिकीट किती असेल?

फ्लाय ९१ या विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर - गोवा आणि मुंबई विमानसेवा पुढील महिन्यात २३ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी अद्याप बुकिंग सुरु झाले नसल्याची माहिती समोर आली असून, ते लवकरच सुरु होईल, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, बुकिंग सुरु झाले नसल्याचे तिकीटाचे दर अद्याप समोर आलेले नाहीत.

सोलापूरला गोवा आणि मुंबईसाठी थेट विमानसेवा मिळाल्याने दोन ठिकाणच्या पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळणार आहे. तसेच, या सेवेचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सोलापूर ते गोवा हे अंतर अवघ्या एका तासांत गाठता येणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT