Soil Erosion on Goa Beaches  Dainik Gomantak
गोवा

गोव्याची चिंता वाढवणारी बातमी; किनाऱ्यांचा होतोय ऱ्हास, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

गोव्यातील समुद्रकिनारी असणारी वाळू सातत्यानं कमी होत असल्यामुळं गोव्यातील किनाऱ्यांचा ऱ्हास होत आहे.

Pramod Yadav

गोव्यातील समुद्रकिनारी असणारी वाळू सातत्यानं कमी होत असल्यामुळं गोव्यातील किनाऱ्यांचा ऱ्हास होत आहे. धूप झाल्यामुळे किनाऱ्यावरील वाळू समुद्राच्या प्रवाहात वाहून जात आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वतीने याबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) कडे सोपवण्यात आली होती. दरम्यान, 2021 मध्ये आलेल्या या अहवालातून चिंताजनक माहिती समोर आली आहे.

पर्यावरणमंत्री निलेश कब्राल यांनी राज्यातील पाच प्रमुख समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याची माहिती सभागृहात दिली. अपक्ष आमदार आलेक्स लॉरेन्स यांच्या प्रश्नाला काब्राल उत्तर देत होते.

पाच समुद्रकिनाऱ्यांची सर्वाधिक धूप

पेडणे तालुक्यातील केरी, बार्देशमधील कोको, सासष्टीतील माजोर्डा आणि मोबोर ते बेतुल दरम्यानचा भाग, बेतालभाटी आणि केपे तालुक्यातील खणगिणी या किनाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

2021 साली राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याद्वारे गोव्याच्या किनारपट्टीचा अभ्यास, क्षरण, पेडिमेंट वाहतूक यांचा अभ्यास करण्याचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) कडे सोपवले होते. यातून ही माहिती समोर आली आहे.

समुद्राची पाणीपातळी वाढण्यामागे जागतिक तापमानवाढीचे महत्वाचे कारण सांगितले जात आहे. नेदरलँडमध्येही अशीच समस्या उदभवली होती. पण, तंत्रज्ञानाच्या बळावर या देशानं हे संकट थोपवून धरलं आहे.

समुद्राची पाणीपातळी वाढण्यामागे जागतिक तापमानवाढीचे महत्वाचे कारण सांगितले जात आहे. नेदरलँडमध्येही अशीच समस्या उदभवली होती. पण, तंत्रज्ञानाच्या बळावर या देशानं हे संकट थोपवून धरलं आहे.

दरम्यान, गोवा कोस्टल मॅनेजमेंट एनवायरमेंट सोसायटीनं या किनाऱ्यांची बचावासाठी एक अभियान सुरु केलं आहे. यासाठी नेदरलँडच्या काही संस्थांमधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. अशी माहिती निलेश काब्राल यांनी दिली.

तसेच, पेडणे तालुक्यातील केरी, बार्देशमधील कोको, बेतुल खणगिणी या किनाऱ्यांवर कॉन्क्रीटचे ठोकळे टाकत माती- वाळू वाहून नेण्याच्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT