Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Accident: चिखलमय रस्त्यावरून दुचाकी घसरली, अंगावरून गेला ट्रक; डिचोलीतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Socorro Porvorim Accident: सुकूर-पर्वरी येथे महामार्गावर दुचाकी घसरली त्यानंतर कोसळलेल्या सनी नार्वेकर याच्या अंगावरून अवजड वाहन गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Panditrao

म्हापसा: सुकूर-पर्वरी येथे चिखलमय महामार्गावर दुचाकी घसरली. त्यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या सनी नार्वेकर (वय २८ वर्षे, रा. नानोडा-डिचोली) याच्या अंगावरून अवजड वाहन गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यात दुचाकीचालक शुभय मावळींगकर हा किरकोळ जखमेवर बचावला.

उपलब्ध माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी (ता. १८) सकाळी १० च्या सुमारास घडला. हे दोघे तरुण पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने दुचाकीवरून येत होते. सुकूर येथे महामार्गावरील डांबर आणि काँक्रिट वाहून गेल्याने पावसामुळे रस्ता चिखलमय बनला आहे. या रस्त्यावरून जाताना दुचाकी घसरली आणि मागे बसलेला सनी नार्वेकर हा दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला.

त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्याला बेदरकारपणे चिरडले. त्यातच सनी याचा अंत झाला. दुचाकीचालक शुभय मावळींगकर हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला कलंडला. त्यात तो किरकोळ जखमी झाला.

पर्वरी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. जखमी शुभय याच्यावर पर्वरी आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातानंतर पलायन केलेल्या त्या अज्ञात ट्रकचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

सनी नार्वेकर हा मित्र शुभय याच्यासमवेत गोमेकॉमध्ये आईचा वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी गेला होता. हा अहवाल घेऊन ते म्हापशाकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. सनी हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

Taxi Driver Assault: गोवा माईल्‍सच्‍या चालकाला मारहाण! टॅक्‍सीचालकांची दादागिरी; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

Goa: ..रुक जाना नहीं तू कहीं हारके! 1104 अर्ज करूनही नोकरी नाही, पदवीधर 'विठोबा' बनला मेकॅनिकचा हेल्पर

'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

SCROLL FOR NEXT