VIDEO: 1 नाही, 2 नाही, गोव्यात उलटल्या 3 गाड्या! सहा तास वाहतूक ठप्प; गॅस गळतीमुळे स्थानिक भयभीत

Goa Tanker Accident: कारवार–मडगाव हमरस्त्यावर पाडी–बार्से येथे वळणावर सिलिंडर वाहतूक करणारा टॅंकर उलटल्याने सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली.
Goa Tanker Accident
Goa Tanker AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण/वास्को: राज्यातील विविध भागांत मंगळवारी टॅंकर उलटण्याच्या घटना घडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कारवार–मडगाव हमरस्त्यावर पाडी–बार्से येथे वळणावर सिलिंडर वाहतूक करणारा टॅंकर उलटल्याने सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली.

दुपारी सुमारे दीड वाजता हा अपघात झाला. त्यानंतर मडगाव–कारवारकडे जाणारी वाहतूक बाळ्ळी–खणगिणी मार्गे, तर कारवार–मडगाव वाहतूक चाररस्ता–आगोंद मार्गे वळविण्यात आली. टॅंकर उलटताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले

आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत उलटलेला टॅंकर हटविण्याचे काम सुरू होते, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.

दरम्यान, दाबोळी विमानतळासमोरील उड्डाणपुलावर सायंकाळी सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक कलंडला. वळणावर वेग कमी न करता ट्रक वळविण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. या घटनेत क्लिनर जखमी झाला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Goa Tanker Accident
Goa Fire Accident: मध्यरात्री आगीचा तांडव! म्हावळींगेत दुकान जळून खाक, 'इतक्या' लाखांचं नुकसान; सुदैवानं मोठी जीवितहानी टळली

सीएनजी टेम्पोतून गॅस गळती

धारबांदोडा येथे मंगळवारी सकाळी सीएनजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून गॅस गळती झाल्याची घटना घडली. सुदैवाने, गळती झालेल्या गॅसने पेट न घेतल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

Goa Tanker Accident
Goa Accident: शिवोली पुलावर भीषण अपघात; कार आणि कदंब बसची समोरासमोर धडक, वाहतुकीचा मोठा खोळंबा

स्थानिकांच्या माहितीनुसार जीए-०४-टी-६१८७ क्रमांकाचा टेम्पो फोंडा येथून मोलेच्या दिशेने जात होता. धारबांदोडा येथील शासकीय इमारतीसमोर पोहोचताच मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच चालकाने टेम्पो थांबवून पाहणी केली असता गॅस गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com