Sharjah to Goa Flight: शारजातून ‘मोपा’वर उतरणार विमान! युरोपातून येणारी सेवा वळवली; ‘दाबोळी’वरून आखाती देशांतील सेवा रद्द

Israel America Iran war: शारजा येथून एअर अरेबियाचे विमान ता. ४ दुपारी १.२० वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे.
Air Arabia Sharjah to Goa | Goa Mopa airport flight
Air Arabia Sharjah to Goa | Goa Mopa airport flightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : इस्त्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखातातील बहुतांश विमानसेवा बंद पडली आहे. असे असले तरी शारजा येथून एअर अरेबियाचे विमान ता. ४ दुपारी १.२० वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे.

शारजा येथे जाण्यासाठी हे विमान दुपारी २ वाजता निघेल. मस्कत येथून येणारे विमान मोपा येथे सकाळी ७.२० वाजता उतरणार आहे. दोहा येथून मोपा येथे उत्तररात्री २.३५ वाजता पोचणारे कतार एअरवेजचे विमान रद्द करण्यात आले आहे.

त्यामुळे उद्या ४.१० वाजता मोपाहून दोहा येथे जाणारे विमानही निघणार नाही. युरोपातून येणारी काही प्रमाणातील विमानसेवा अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे मॅंचेस्टरहून येणारे टीयूआयचे विमान मोपा येथे सकाळी १०.५५ वाजता उतरणार आहे. परत प्रवासासाठी हे विमान दुपारी १२.५५ वाजता निघेल, अशी माहिती मिळाली.

Air Arabia Sharjah to Goa | Goa Mopa airport flight
Missile Attack: लाईव्ह व्हिडिओत कोसळलं 'मिसाईल'! दुबईतलं धडकी भरवणारं फुटेज व्हायरल; महिलेचा जागीच मृत्यू Watch Video

‘दाबोळी’वरून आखाती देशांतील सेवा रद्द

दाबोळी विमानतळावरील आखाती देशांतील सेवा रद्द राहील. दुबईहून दाबोळीला सकाळी ७.१० वाजता पोचणारे आणि दुबईला रात्री ११.१० वाजता जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. याशिवाय बहरिन गोवा बहरिन ही रात्री दहा वाजताची विमानसेवाही उद्या (ता.४) उपलब्ध नसेल.

Air Arabia Sharjah to Goa | Goa Mopa airport flight
Dabolim Plot Fraud: 53 लाख घेतले, पण प्लॉटविक्रीच्या नावावर फसवले! दाबोळीतील घटना; भोपाळच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

उड्डाणांना फटका

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि चेन्नई विमानतळांवरील अडीचशेपेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मागील चार दिवसांपासून हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com