Rohan Khaunte

 

Dainik Gomantak 

गोवा

सुकूर पंचायत माजी आमदार रोहन खंवटेंच्या दबावाखाली; रितेश चोडणकरांचा आरोप

‘आप’ने (AAP) पंचायत संचालनालय आणि गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना नोटीस दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: रोहन खंवटे यांच्या दबावाखाली वावरून सुकूर (Socorro) पंचायतीच्या सभागृहात आपला नियोजित कार्यक्रम करण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप पर्वरीचे आम आदमी पक्षाचे उमेदवार रितेश चोडणकर (Ritesh Chodankar) यांनी केला आहे. पंचायतीच्या सभागृहात कार्यक्रम करण्यासाठी आपण 7 दिवस आधी नोंदणी केली होती. पण, आयत्या वेळेला दुसरा कार्यक्रम असल्याची बतावणी करून आपला कार्यक्रम आयोजित करण्यास पंचायत दादागिरी करून अडथळे आणत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चोडणकर म्हणाले, मी कार्यक्रमाच्या सात दिवस अगोदर सभागृहाची चौकशी केली होती आणि सभागृह उपलब्ध होते. मला करार देण्यात आला. मात्र, मी रक्कम भरण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी सभागृह पर्वरीचे माजी आमदार रोहन खंवटे यांच्या कार्यक्रमासाठी राखीव असल्याचे सांगून परवानगी नाकारली.

दरम्यान, ‘आप’ने (AAP) पंचायत संचालनालय आणि गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना नोटीस दिली आहे. सुकूर पंचायतीकडून मिळालेल्या असहकार्याची चौकशी सुरू करण्यासाठी ही नोटीस देण्यात आल्याचे आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

करार परत करण्यास सचिवांचा नकार

मला जेव्हा समजले की, सभागृह खंवटे यांच्या कार्यक्रमासाठी राखीव आहे, तेव्हा मी सचिवांना करार परत करण्यास सांगितले. पंचायतीच्या सचिवाने तसे करण्यास नकार दिला. माझ्याकडे घटनेचे रेकॉर्डिंग आहे. मी सरपंचांशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही असा आरोप रितेश चोडणकर यांनी केला.

आमदारांकडून अधिकाराचा दुरुपयोग

दुसऱ्या दिवशी आम्ही तपासायला गेलो तेव्हा पंचायत सभागृहात कोणताही कार्यक्रम होत नव्हता. पर्वरीचे माजी आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होते. अशाप्रकारे स्थानिक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत आणि हे थांबले पाहिजे, रितेश चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT