मोरेन रिबेलो पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

रिबेलो यांनी 10 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपात प्रवेश केला होता.
Congress

Congress

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मडगाव: केवळ 20 दिवसांतच भाजप पक्षाचा राजीनामा दिलेले कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो (Moren Ribello) यांनी आज (शुक्रवारी) अपेक्षेनुसार काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कुडतरीचे काँग्रेस गट अध्यक्ष मिलाग्रीस फर्नांडिस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
प्रवीण आर्लेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

गोव्यात (Goa) सुशासन केवळ काँग्रेस (Congress) पक्षच देऊ शकतो याची खात्री पटल्यानेच आपण 20 दिवसांतच भाजपचा त्याग करून पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपात गेलेले त्यांचे सहकारी आणि कुडतरीचे उपसरपंच सायमन बार्रेटो, मोरेन यांच्या जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या पत्नी मिशेल रिबेलो आणि कुडतरी काँग्रेस गटाचे माजी अध्यक्ष मिलाग्रीस रॉड्रिग्स हेही यावेळी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
लोकशाहीत जनताच 'सुप्रीम':श्रीधरन पिल्लई

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आपण पुन्हा काँग्रेस पक्षात यावे अशी गळ घातली आणि आपण ती मान्य केली असे रिबेलो म्हणाले. यावेळी गटाध्यक्ष फर्नांडिस यांनी आता कुडतरीत सर्व काँग्रेस सदस्य एकत्र येऊन पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. रिबेलो यांनी 10 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस सोडल्यावर काल रिबेलो यांनी भाजपला राम राम ठोकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com