Subhash Faldesai Dainik Gomantak
गोवा

'समाजकल्याण खात्याच्या योजनांचा फेरआढावा घेणार'

मंत्री सुभाष फळदेसाई: दुहेरी लाभ घेणाऱ्यांना वगळणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नव्याने आढावा घेणार आहे,अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मंगळवारी दिली.

फळदेसाई म्हणाले,की राज्यातील सामाजिक योजना या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी बनविण्यात आल्या आहेत. मात्र काही सधन लोकही याचा फायदा घेत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पात्र आणि गरजू व्यक्तींवर अन्याय होतो. त्यामुळे दुहेरी लाभ घेणाऱ्या सर्व लोकांना अशा योजनेतून वगळण्याची गरज आहे.

ज्या पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ मिळलेला नाही, त्यांना लवकरच मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. ज्या योजना पुढे नेणे अवघड आहे, अशांचा आढावा घेऊन त्याऐवजी नवीन योजना अंमलात आणल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंदिर पुनर्निर्मिती धोरणाबाबत बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले, की पोर्तुगीज काळात अनेक हिंदू मंदिरांचा विद्ध्वंस करण्यात आला. ती मंदिरे कोणी पुन्हा बांधणार म्हणत असतील, तर त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही. याला कट्टर धार्मिकतेचे नाव देणे चुकीचेच आहे. केवळ हिंदू नव्हे दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळांची मोडतोड झाली असेल तर आम्ही त्यांचीही पुनर्बांधणी करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT