Amit Patkar |Lok Sabha Election
Amit Patkar |Lok Sabha Election dainik gomantak

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज: अमित पाटकर

चेतना यात्रा; लोकांच्या भावना जाणून घेणार
Published on

पणजी: लोकसभेला अद्याप वेळ असला तरी कॉंग्रेसने यावेळेस तिन्हीही जागा जिंकण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले आहे. समविचारी आणि सहानुभूतीधारकांना एकत्र करीत पक्षाला बळकटी आणण्याच्या उद्देशाने 21 ते 29 एप्रिलपासून कॉंग्रेस चेतना यात्रा काढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. यावेळी पक्षाचे आर्चित नाईक, कॅप्टन विरीयेतो फर्नांडिस, समीर पै रायकर, महेश म्हांबरे उपस्थित होते.

Amit Patkar |Lok Sabha Election
घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करा: विश्‍वजित राणे

लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी कॉंग्रेसने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. दक्षिण गोव्याची जागा आमचीच आहे आता आम्ही उत्तरेत लक्ष केंद्रीत करीत आहोत, असे सांगत प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी चेतना यात्रेची घोषणा केली आहे. ही नव्या पिढीची नवी कॉंग्रेस असून, प्रत्येक मतदारसंघातील समस्या, सूचना पुन्हा समजून घेऊ. राज्यात भाजपचे सरकार आले तरी त्यांच्या विरोधात 67 टक्के लोक आहेत. निवडून आलेल्यांपैकी आठ आमदार नव्याने विधानसभेत आले आहेत. 70 टक्क्यांपेक्षा अधिक उमेदवारही नवे होते आणि 14 पेक्षा अधिक जागांवर कमी मतांनी आम्ही हरलो. पक्षात संजीवनी आणण्यासाठी गोवामुक्तीची मशाल जिथे पेटली, त्या कुंकळ्ळीतून चेतना यात्रा सुरू करत आहोत,असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com