Shailendra Welingkar & Tara Kerkar
Shailendra Welingkar & Tara Kerkar Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोली बलात्कार प्रकरणातील संशयितांना अटक करा; सामाजिक संघटना आक्रमक

दैनिक गोमन्तक

डिचोली: सर्वत्र खळबळ माजलेल्या डिचोलीतील (Dicholi) अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी करून, या प्रकरणात गुंतलेल्यांना अटक करा. अशी मागणी करीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सायकांळी डिचोली पोलिस स्थानकावर (Dicholi Police Station) धडक दिली. यामुळे या बलात्कार प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली असून, याप्रकरणी पोलिस आणखी काही संशयितांना ताब्यात घेवून चौकशी करण्याची शक्यता वाढली आहे. (Social organizations are demanding the arrest of the suspects in the Bicholim rape case)

दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करीत असून, पिडीत मुलीची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी घेतल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. या बलात्कार प्रकरणी एक संशयित युवक सध्या अटकेत आहे. त्याची पोलिसांनी जबानी घेतली असून, त्याच्याकडील मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात अन्य काहीजणांची नावे समोर येत आहेत. त्यांची चौकशी करून त्यांचा प्रकरणाशी संबंध असल्यास, संशयितांना अटक करून, पिडीत मुलीला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी परशुराम गोमंतक सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर (Shailendra Welingkar), एनजीओ तारा केरकर (Tara Kerkar) आदींनी केली आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही. असा इशाराही विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

लैगिक अत्याचाराची बळी ठरलेली ती मुलगी विद्यार्थिनी आहे. लैगिक अत्याचारामुळे ती मुलगी गरोदर राहिली असून, ही अत्यंत हीन घटना आठ दिवसांपूर्वी डिचोलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून मागील 25 जून रोजी अरमान खान या संशयित युवकाला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काहीजण गुंतले असल्याची चर्चा चालू असतानाच, कथित बलात्कार प्रकरणात किमान दहाजण गुंतले असल्याचा दावा परशुराम गोमंतक सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून काल केल्यानंतर डिचोलीत एकच खळबळ उडाली आहे. प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी चर्चा शैलेंद्र वेलिंगकर यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून एनजीओंसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मिळून शंभरहून अधिकजण सोमवारी सायकांळी डिचोली पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले.

शैलेंद्र वेलिंगकर यांच्यासह एनजीओ तारा केरकर, शिवसेनेच्या महिला प्रमुख ऐश्वर्या साळगावकर, राष्ट्रीय हिंदू महासभेचे विनायक नास्नोळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष किशोर राव, सलमान खान, रेश्मा बिजली आदी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांची भेट घेवून प्रकरणाचे तपासकाम कुठपर्यंत पोचले त्याची माहिती जाणून घेतली. या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करून लैगिक अत्याचार केलेल्या गुन्हेगारांना कडक शासन द्या. अशी मागणी केली. पिडीत मुलीची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी होईपर्यंत थांबा. असे पोलिस निरीक्षकांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे.

पिडीत मुलीला सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, हा प्रकार म्हणजे डिचोलीसाठी अत्यंत लज्जास्पद घटना असल्याचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT