Goa: 'महिला, युवतींना सन्मान देणारे एकमेव भाजप सरकार'- आमदार दयानंद सोपटे

महिलांनी स्वावलंबी बनावे, सन्मानाने जीवन जगण्यासाठी नारी शक्ती सक्षम बनवण्यासाठी भाजपा सरकारच (BJP government) वेगवेगळ्या योजना राबवू शकतात .
Dayanand Sopte
Dayanand SopteDainik Gomantak
Published on
Updated on

महिलांनी स्वावलंबी बनावे, सन्मानाने जीवन जगण्यासाठी नारी शक्ती सक्षम बनवण्यासाठी भाजपा सरकारच (BJP government) वेगवेगळ्या योजना राबवू शकतात . म्हणूनच परत एकदा तुमचा आमदार मंत्री नसला तरीही राज्यातील चाळीसही मतदार संघापैकी मान्द्रेतील (Mandre) आमदाराने तिसऱ्या क्रमांकावर 180 युवतीला लाडली लक्ष्मि योजनेंतर्गत एक कोटी 80 लाख रुपये मंजूर करून आणले ,हे सरकार गरिबांचे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे , आमदाराचे तुम्हाला काम आवडले तर परत एकदा आपल्याला 2022 च्या निवडणुकीत संधी द्या, असे आवाहन गोवा पर्यटन विकास महामंडळ (Goa Tourism Development Corporation) चेरमेन दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांनी 5 रोजी मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात लाडली लक्ष्मी योजनेतील (Ladli Lakshmi Yojana) लाभार्थीना मंजुरी पत्रे वितरीत केल्यानंतर त्यांनी केले.

मांद्रे मतदार संघातील केरी –तेरेखोल , पालये , हरमल , मांद्रे , मोरजी , आगरवाडा , पार्से , तुये व विर्नोडा भागातील एकूण 180 युवतीला लाडली लक्ष्मि योजनेची मंजुरी पत्रे वितरीत केली . यावेळी भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर , मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब ,महिला अध्यक्ष दीपा तळकर , महिला उत्तर गोवा अध्यक्ष नयनी शेटगावकर , उपाध्यक्ष तथा माजी सरपंच एकता चोडणकर हरमल सरपंच मनोहर केरकर, माजी सरपंच मनीषा कोरखणकर ,मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर , आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर ,पार्से सरपंच प्रगती सोपटे , तुये सरपंच सुहास नाईक , माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक , विर्नोडा सरपंच मंगलदास किनळेकर , हरमल माजी सरपंच अनंत गडेकर, अनिशा केरकर , मांद्रे माजी सरपंच तारा हडफडकर , पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत आदी उपस्थित होते.

Dayanand Sopte
Goa: कलम 144 रद्द करावे- गिरीश चोडणकर

71 नागरिक कोरोनाने मरण पावले

मांद्रे मतदार संघात कोरोनाच्या महामारीतून एकूण 71 नागरीकांचा मृत्यू झाला , त्या सर्वांच्या वारसदाराना प्रत्येकी 2 लाख रुपये सरकारच्या योजनेतून दिले जाईल त्यासाठी सर्व कागदपत्रे आपल्या कार्यालयात आहे , त्याचा लाभ आपण मिळवून देणार , शिवाय फुल फळ विक्रत्ये मासे विक्रेत्ये रिक्षा चालक , पायलट या छोट्या व्यावसायीकांच्या घरातही पाच हजार पोचण्याची योजना सरकारने राबवलेली आहे , त्याचा लाभ मिळवून दिला जाईल त्यासाठी आपल्या कार्यालयात गरजवंतानी नाव नोदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सोपटे यांनी केले.

गरीब आमदाराला गरिबांची जाण

तुमचा आमदार हा गरिबीतून वर आलेला , गरिबांचे दुखणे काय असते त्याची जाणीव आपल्याला आहे , त्यासाठी गरिबाना सर्व सोयी सुविधा योजना मिळवून देण्यासा आपण कार्यरत असल्याचे सांगितले . शेतीसाठी भविष्यात सर्व योजना आम्दार्कीतून मतदार संघात राबवणार असल्याची घोषणा केली.

पोटले आम आदमी वाटतात

भाजपा सरकारने कोरोना काळात देशभरात 80 कोटी कुटुंबियाना 5 किलो मोफत कडधान्य वितरीत केले आणि त्याचा लाभ मिळवून दिला , आता कोणी तरी आम आदमी पार्टीचा पोटले वाटत आहे ते कोरोना काळात कुठे होते कुणाला माहित असे कुणाचेही नाव न घेता आमदार सोपटे यांनी टोला मारला.

Dayanand Sopte
Goa Curfew: संचारबंदीची नवी अधिसूचना जारी, हॉटेलचालक खुश तर कसिनो बंदच

सरपंच सुभास आसोलकर

मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर यांनी बोलताना भाजपा सरकारचे पहिले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे डोके सुपर असल्याने त्यांनी गरिबासाठी वेगवेगळ्या योजना निर्माण केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली . गरजवंताची गरज ओळखून योजना भाजपा सरकारने राबवल्या . लाडली लक्ष्मि हि योजना सामान्य नव्हे आमदाराने एक कोटी ८० लाख रुपये एका टप्प्याने आणले नाही तर यापूर्वीही आणले . लाडली लक्ष्मि योजना सर्वात चांगली योजना दान करण्याची दानत हि केवळ मनोहर पर्रीकर यांनाच होती , म्हणून अश्या योजना राबवल्या जातात असे त्यांनी सांगितले.

Dayanand Sopte
Goa: भाजप सरकारचा महिला सबलीकरणात महत्वाचा वाटा

दीपा तळकर

भाजपा महिला नेत्या दीपा तळकर यांनी बोलताना भाजपा सरकारने जात पात धर्म न पाहता सर्व धर्मातील ज्या 18 वर्षाच्या मुलीना लाडली लक्ष्मि योजना राबवली , या पूर्वीच्या कोणत्याही सरकारला ती राबवता आली नाही , या पैशातून लग्नाआगोदर तिच्या उच्चशिक्षणा साठी किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी त्याचा वापर करता येतो . या भागाचे आमदार दयानंद सोपटे यांनी उज्जव भविष्यासाठी लाडली लक्ष्मिचा लाभ जास्तीत जास्त मतदार संघातील युवतीला लाभ मिळवून देत आहे . सर्व सामान्य गरिबांना आधार देण्यासाठी या योजना कार्यरत केल्या. मधु परब यांनी बोलताना केवळ भाजपानेच गरिबासाठी योजना राबवल्याचा दावा करून लाडली लक्ष्मी चे श्रेय सर्व भाजपला जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com