Social media does not influence us, say voters in Goa Dainik Gomantak
गोवा

सोशल मीडियाचा गोव्यातील मतदारांवर प्रभाव?

सोशल मीडियावर अनेक बनावट, निराधार, क्षुल्लक बातम्या येतात, त्यामुळं..

दैनिक गोमन्तक

मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी मतदारांच्या मनावर परिणाम करण्यात सोशल मीडियाची मोठी भूमिका आहे, असे मानले जात आहे. त्याउलट, गोव्यातील अनेक लोकांचा असा समजत आहे की ते माहितीसाठी चांगले आहे परंतु ते त्यांच्या उमेदवार निवडण्याच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाही.

अनेक राजकीय पक्ष आणि नेते एकतर त्यांचे सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म चालवण्यासाठी ‘तज्ञ’ नियुक्त करतात. या अपेक्षेने की ते मतदारांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने मतदान करण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी प्रभावित करू शकतील.

मतदार म्हणतात की, सोशल मीडियाचा मतदारांवर काहीही परिणाम होत नाही. मतदारांनी आधीच ठरवले आहे की मत कोणाला द्यायच मग यात सोशल मीडिया निर्णायक मत घेण्यासाठी कोणतीही भूमिका बजावत नाही.

“सोशल मीडियावर खूप गोंधळ आहे. उमेदवाराला पाठिंबा देणारी किंवा विरोधात असलेली व्यक्ती आपण पाहतो. यातून अनेक बनावट, निराधार, क्षुल्लक बातम्या येतात. त्यामुळे मतदानाच्या निर्णयावर त्याचा परिणाम होत नाही. मी माझे मत तयार करण्यासाठी प्रिंट मीडिया आणि वैयक्तिक मुलाखती यासारख्या पारंपारिक पद्धतींवर विसंबूत आहोत.”

सोशल मीडिया निश्चितपणे नागरिकांवर प्रभाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि मतदारांना राजकीय माहिती मिळवण्याच्या आणि प्राप्त करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याच काम करत. मात्र जेव्हा मतदानाचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा प्रभाव पडत नाही. क्षेत्रीय कार्य, नम्रता आणि माहिती असलेल्या राजकारण्यांचा स्वभाव यामुळे योग्य उमेदवार निवडण्यात मदत होते.

सोशल मीडियाचा लोकांचे राजकीय ज्ञान, दृष्टीकोन आणि वर्तन घडवण्यात मोठा प्रभाव पडतो. विविध राजकीय पक्षांच्या पार्श्वभूमीबद्दल चांगली माहिती असेल ज्यामुळे पात्र उमेदवाराला मतदान करण्यात मदत होते. असही मत मतदार व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर राजकारणाशी (Politics) संबंधित तथ्यात्मक माहिती मिळते, परंतु उमेदवार आणि पक्षांवरील इतर लोकांच्या मतांचा संदर्भ इथे मिळत नाही. दुसऱ्याचे मत आपल्यावर लागू करण्यापेक्षा आपल स्वतःचे मत बनवण्यात आणि त्याचे पालन करण्यावर विश्वास आहे आणि नंतर त्या मतांवर आधारित निर्णय घेण्यावर मतदार विश्वासू असल्याच सांगतात.”

कोणताही प्रभाव पडला किंवा काही परिणाम झाला असे मला वाटत नाही. यात काही शंका नाही की मी सोशल मीडियावरील वेगवेगळ्या राजकारण्यांची आणि त्यांच्या संबंधित पक्षाच्या पेजची देखील तपासणी केली आहे परंतु केवळ माहितीसाठी.”

“सोशल मीडियावर विसंबून राहण्याऐवजी आम्ही न्यूज पोर्टल्सवर वस्तुस्थिती पाहिली, तसेच त्यावर विश्वास ठेवला; असल्याच ही मत अनेक मतदारांनी नोंदवल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT