गोवा

Pratima Coutinho Protest: 'जोपर्यंत नगरसेवक डिकॉस्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत...'; प्रतिमा कुतिन्हो यांचा पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या!

Meshu Dicosta Justice Demand: सांगेचे नगरसेवक मेशु डिकॉस्ता यांना न्याय द्यावा, अशी मागणी करून सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सांगेचे नगरसेवक मेशु डिकॉस्ता यांना न्याय द्यावा, अशी मागणी करून सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी बुधवारी दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडले. पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हे तातडीच्या बैठकीस हजर राहण्यासाठी गेले असल्याने ते कार्यालयात नव्हते. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण हटणार नाही, असा पवित्रा प्रतिमा कुतिन्हो (Pratima Coutinho) यांनी घेतला. अखेर पोलिस अधीक्षकाने शनिवारी भेटण्याची वेळ दिल्याने कुतिन्हो व डिकॉस्ता घटनास्थळावरून निघाले.

डिकॉस्ता व बाबल नाईक यांच्याविरोधात सांगे (Sanguem) पोलिस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने तक्रार नोंदविली असून पोलिसानी डिकॉस्ता याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. सरकारी अधिकाऱ्याला कामात अडथळा आणणे सरकारविरोधात खोटे आरोप करणे आदी प्रकरणात डिकॉस्ता यांच्याविरुद्ध तर नाईक यांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रण करून नंतर ते समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर कुतिन्हो व डिकॉस्ता दोघेही पोलिस अधीक्षकांना भेटून या तक्रारीबाबत अधीक माहिती जाणून घेण्यासाठी आले होते.

दरम्यान, कुतिन्हो म्हणाल्या, की डिकॉस्ता हे सांगे येथील एका पुलाच्या कामाबाबत तक्रार घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात गेले होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुरुवारी ते पोलिस ठाण्यात हजर न राहिल्यास त्यांना अटक करण्यात येईल, असे बजाविले. त्यांनी कुठलाही गुन्हा केला नसून हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT