Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport : तर दाबोळी विमानतळ कसे सुरू राहणार; युरी आलेमाव यांचा सवाल

Dabolim Airport : त्यावर सभापतींनी कोणताही विषय मांडण्याआधी परवानगी घेणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सभागृहाचा वेळ वाया घालवू नका. त्यावर आलेमाव यांनी विमानसेवा हा महत्त्वाचा विषय आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, कोणत्या विमानतळावरून सेवा द्यायची, हा सर्वस्वी विमान कंपन्यांचा अधिकार असतो. असे असेल, तर मग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दाबोळी विमानतळ सुरू राहणार हे कशाच्या जोरावर सांगत आहेत, अशी विचारणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा आलेमाव यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, कोणत्या विमानतळावरून सेवा पुरवायची,

हा विमान कंपन्यांचा अधिकार असतो. असे आहे, तर मग दाबोळीवरून विमान कंपन्या सेवा सुरू ठेवतील, असे मुख्यमंत्री कसे सांगू शकतात? सरकारचे विमान कंपन्यांवर नियंत्रण नाही, तर मग दाबोळी कसा सुरू ठेवणार?

त्यावर सभापतींनी कोणताही विषय मांडण्याआधी परवानगी घेणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सभागृहाचा वेळ वाया घालवू नका. त्यावर आलेमाव यांनी विमानसेवा हा महत्त्वाचा विषय आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT