Jharkhand Goa Train Dainik Gomantak
गोवा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Jharkhand Goa Train: जसीदीह ते वास्को - द - गामा या ट्रेन क्रमांक - १७३२२ या २१ ऑक्टोबरच्या ट्रेनमध्ये साप आढळून आला.

Pramod Yadav

Snake Found In Jharkhand-Goa Train

वास्को: झारखंडहून गोव्याला येणाऱ्या वास्को-द-गामा साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनच्या सेकंड एसी कोचमध्ये साप आढळून आल्याने गोंधळ उडाला. प्रवाशांनी कोचमधून बाहेर पडत मदतीची मागणी केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

सापाला पकडून नंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ट्रेनमध्ये साप आढळल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शेअर केला आहे. तेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

झारखंड-वास्को-द-गामा एक्सप्रेसमध्ये 21 ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या एसी कोचमध्ये ही घटना घडली. व्हिडिओमध्ये खालच्या बर्थच्या बाजूला पडद्याभोवती साप रेंगाळताना दिसत आहे.

अंकित कुमार सिन्हा यांनी 21 ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

जसीदीह ते वास्को - द - गामा या ट्रेन क्रमांक - १७३२२ या २१ ऑक्टोबरच्या ट्रेनमध्ये साप आढळून आला. या ट्रेनच्या एसी-२ टीअर (ए२ ३१, ३३) माझे आई वडील प्रवास करत होते. त्यांच्यावतीने मी तक्रार देत आहे. कृपया याची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अंकित कुमार सिन्हा यांनी केलीय.

दरम्यान, कोचमध्ये साप असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी तातडीने दाखल झाले. आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांसह एक व्यक्ती सापाला चादरीत गुंडाळून बाहेर काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच. रेल्वेकडूनही उत्तर देण्यात आले आहे. तुमची तक्रार स्वीकारण्यात आल्याचे रांची रेल्वे बोर्डाने म्हटले असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT