Panaji Smart City
Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City Panjim: ‘स्मार्ट’ कामांतील अडसर होणार दूर; ‘ती’ दोन झाडे हटवण्यास परवानगी

गोमन्तक डिजिटल टीम

स्मार्ट पायाभूत सुविधा विकसीत करण्याची पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडकडे (आयपीएससीडीएल) जबाबदारी आहे. सांतिनेजमधील रस्त्याचा कायापालट करण्यात अडथळा ठरणारे दोन वृक्ष हटविण्याचे व त्यांचे स्थलांतर करण्याची परवानगी संबंधित यंत्रणेला मिळाली आहे.

‘आयपीएससीडीएल’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या झाडांमुळे या रस्त्याच्या कामाला विलंब होत आहे.

शहरातील झाडांची सुरक्षितता ही वनविभागाकडे आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प आराखड्याची बारकाईने तपासणी केली.

गोवा राज्य नागरी विकास संस्थेने (जीसुडा) वनखात्याकडे विनंती केल्यानंतर ती झाडे हटविण्याची व पुनर्रोपणाची परवानगी दिल्याचे उत्तर गोवा विभागाचे उपवनसंरक्षक जीस्स के. वर्की यांनी म्हटले आहे.

कामत प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्थेने (सीएचएस) या वृक्षाची मुळे जलवाहिन्या व इमारतींच्या बांधकामाला धोका पोहचवू शकतात. त्यामुळे ८ जानेवारी २०२४ रोजी कामत प्लाझा सोसायटीची बैठक आयोजित करून वृक्ष हटविण्याचा ठराव मंजूर करून घेतला गेला.

हटविलेल्या झाडांचे नुकसान भरून काढण्यासाठी आयपीएससीडीएलने ‘ग्रीन कव्हर'' उपक्रम सुरू केला. या भरपाई धोरणामध्ये मजबूत आणि उंच वाढणार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. सुमारे ५०० झाडांची रोप लावण्यात येणार आहेत.

पूर्ण झालेल्या मिनेझिस ब्रागांझा रोडवर आणि डॉ. पी. शिरगावकर रस्त्यावर (मध्य पणजी) झाडांनी वेढलेला संपूर्ण भाग पुन्हा हिरवागार झाला आहे. मधुबन कॉम्प्लेक्स ते शीतल हॉटेल, सांतिनेज पर्यंतच्या पट्ट्यामध्ये झाडे लावली जाणार असल्याचे आयपीएससीडीएलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सल्लागार समितीची स्थापना

आयपीएससीडीएलने पणजीमध्ये हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये वृक्षारोपण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांची सल्लागार समिती स्थापन केली आहे. पणजीतील रहिवाशांसाठी हिरवीगार, आरोग्यदायी आणि पर्यावरणीय समतोल राखणारा परिसर तयार करण्याचे हे पाऊल आहे.

‘आयपीएससीडीएल’चे मुख्य महाव्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखालील समितीने विविध तज्ज्ञांच्या गटाला एकत्र आणले आहे. ज्यात पणजी महानगरपालिका (सीसीपी), मिंगेल ब्रागांझा (सदस्य, फलोत्पादनशास्त्रज्ञ आणि गोवा बोटॅनिकल सोसायटी), डॅनियल डिसोझा (लँडस्केप डिझायनर) आणि संदीप आजरेकर (सदस्य, निसर्ग नेचर क्लब) या सदस्यांव्यतिरिक्त इतर तज्ञ सदस्यांनाही सहभागी करून घेतले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT