Panaji Smart City Work: राज्याची राजधानी पणजीत मागील अनेक दिवसांपासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर झालेली खोदकामे यामुळे येथील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनत चालली आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. अशात ही कामे अशीच रखडल्यास पणजीत पाणी तुंबून होणाऱ्या विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार हे निश्चित.
पण स्मार्ट सिटीची कामे केव्हा पूर्ण होणार याची पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले मंत्री बाबूश मोन्सेरात?
पणजीत सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे येत्या 30 मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. तसेच, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला त्याबाबत नोटीस देखील बजावली असल्याची मोन्सेरात म्हणाले.
मंत्री मोन्सेरात यांनी यापूर्वी स्मार्ट शहर आणि सुविधा हव्या असल्यास नागरिकांना थोडी कळ सोसावी लागेल असे वक्तव्य केले होते.
विशेष व्यक्तींना अडथळा महानगरपालिकेची जबाबदारी - फळदेसाई
पणजीतील स्मार्ट सिटी कामाचा सामान्य नागरिकांना त्रास होत असताना विशेष व्यक्तींना देखील त्याचा अत्यंत त्रास होणार यात शंका नाही. मात्र या कामामुळे विशेष व्यक्तींना अडथळा होत असल्यास त्यांनाी तशी तक्रार करावी असा सल्ला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिला आहे.
तसेच. स्मार्ट सिटीच्या कामाचा विशेष व्यक्तींना अडथळा निर्माण होत असल्यास ती संपूर्णपणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.