Panaji Smart City Road Work  Dainik Gomantak
गोवा

BhatlemRoad Closure: भाटलेतील प्रमुख रस्‍ता राहणार 3 दिवस बंद; ‘स्मार्ट सिटीच्या' कामांचा दणका, पर्यायी मार्ग जाणून घ्या

Panaji Smart City Road Closure: इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या वतीने (आयपीएससीडीएल) भाटलेतील एक महत्त्वाचा रस्ता तात्पुरता बंद करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे.

Sameer Panditrao

Panaji Bhatlem Road Closure News

पणजी: ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत भाटलेतील श्रीराम मंदिर ते सीताबाई कॉम्प्लेक्स असा साधारण १०० मीटरचा रस्ता मलनि:स्सारण चेंबरच्या कामांमुळे उद्या शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार आहे. २३ पर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने आल्तिनो-मारुतीगडमार्गे मळ्याकडे जाणारी किंवा मळ्याकडून ताळगाव किंवा भाटलेत जाणारी वाहतूक वळविली जाईल.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या वतीने (आयपीएससीडीएल) भाटलेतील एक महत्त्वाचा रस्ता तात्पुरता बंद करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे. भूमिगत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाय केले जात आहेत.

त्यामुळे शुक्रवार (२१) ते रविवार (२३) या कालावधीत राममंदिर ते सीताबाई कॉम्प्लेक्सपर्यंत मार्ग सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत रहिवासी आणि प्रवाशांना रस्ता उपलब्ध राहणार नसल्याने त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार असल्याचे आयपीएससीडीएलने म्हटले आहे.

नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी वाहतूक वळवणे लागू केले आहे. सांतिनेज आणि ताळगाव ते भाटलेमार्गे फोर पिलार जंक्शनपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आल्तिनोमार्गे वाहतूक वळविण्याचा सल्ला दिला गेला आहे.

त्याचप्रमाणे पणजी आणि सांताक्रुझ येथून राममंदिर जंक्शनकडे जाणाऱ्यांनी रुअ दि ओरेंमार्गे पुन्हा मार्गक्रमण करावे. या बदलाची अंमलबजावणी होत असल्याने नागरिक, व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांना याची दखल घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयपीएससीडीएलने केले आहे.

मिरामार येथे टेम्‍पो रुतला

स्मार्ट सिटीच्या कामानंतर भराव टाकलेली जागा खचल्याने आज सायंकाळी मिरामार येथे शितपेयांची वाहतूक करणारा टेम्पो (जीए ०१ टी ५९४६) रुतला. मागील चाकावरील आलेल्या भारामुळे डाव्या बाजूचे चाक मातीत रुतले. तर, फेब्रुवारी २४ मध्ये २६ रोजी आझाद मैदानावजवळ पाण्याची वाहतूक करणारा टेम्पो रुतला होता. त्यानंतर आत्ता टेम्‍पाे रुतण्याचा प्रकार घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT