
Panaji Smart City Deadline Updated 31 June
पणजी: पणजी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राजधानीतील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची कामे येत्या जूनअखेरीपर्यंत पूर्ण केली जातील तर रस्त्यांची कामे मार्चअखेरीस पूर्ण होतील, अशी हमी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (आयपीएससीडीएल) नोडल अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भातच्या अर्जालाही मान्यता देण्यात आली.
‘आयपीएससीडीएल’ने गोवा खंडपीठाला विविध कामांचा प्रगती अहवाल तसेच अर्धवट उरलेली कामे किती वेळेत व कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण होतील याची सविस्तर माहिती देणारा ‘चार्ट’च सादर केला आहे.
विविध प्रकल्पांच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर त्यावरील डांबरीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल तर पदपथांसह सर्व सुशोभिकरणाची कामे ३१ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती एजी देविदास पांगम यांनी दिली.
या योजनेअंतर्गत राजधानी पणजीतील सर्व कामे पूर्ण करण्याची मुदत जून २०२४ पर्यंत होती. मात्र, पावसाळ्यात ही कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने ती वेळेत पूर्ण करण्यास विलंब होत गेला. तसेच पणजी शहरात काही मीटरवर खोदकाम केल्यानंतर पाणी लागते त्यामुळे पाणी उपसून कामे करावी लागत होती. त्यामुळे दिलेल्या मुदतीत ही कामे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यास मुदतवाढ दिली जावी अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. ती खंडपीठाने मान्य करत मुदतवाढ दिली.
हस्तकला इमारतीपासून (न्यूजीनगर येथील) चार खांब जंक्शनपर्यंतचा ५६० मीटरचा आणि जुन्या पाटो पुलापासून आयकर कार्यालयापर्यंतचा २५० मीटरचा भागाचे काम २८ पर्यंत पूर्ण होणार होते.
पणजीतील १,४१५ मीटरवरील कामांमध्ये यूको बँक ते विनंती रेस्टॉरंट ते एमजी रोड (३८० मीटर), जनरल बर्नार्डो गुएडेस रोड ते गीता बेकरी ते आयनॉक्स जवळील डीबी रोड जंक्शन (५३५ मीटर), जनरल कोस्टा अल्वारेस रोड ते पणजी मार्केट ते डीबी रोड (२०० मीटर), टॉम लिकर शॉप ते डीबी रोड (२०० मीटर) अंतर्गत रस्ता आणि जनरल कोस्टा अल्वारेस रोड (१०० मीटर) वरील दोन अंतर्गत लेन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू होतील,असा अंदाज आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.