Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत बगलमार्गातील नदी फाट्यावर छोटा पूल

नदीपात्राच्या रक्षणासाठी बगल महामार्गाचे काम हाती घेण्यापूर्वी पूल उभारण्यात येणार असल्‍याची माहिती डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Bicholim: राज्य महामार्ग अंतर्गत डिचोलीतील (Bicholim) बगलमार्गात येणाऱ्या पिराची कोंड-डिचोली येथील नदीच्या फाट्यावर लहानसा पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. बगल महामार्गाचे काम हाती घेण्यापूर्वी पूल उभारण्यात येणार असल्‍याची माहिती डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली. नियोजित पूल बांधतानाच नदीतील दगड, माती काढण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही समस्या उद्‍भवणार नाही. जनतेने भीती बाळगण्याचे कारण नाही, अशी ग्वाहीदेखील सभापतींनी दिली.पिराची कोंड परिसरातील बगल महामार्गाची पाहणी केल्यानंतर सभापतींनी पत्रकारांना ही माहिती दिली.

राज्य महामार्ग अंतर्गत डिचोलीत सुमारे 71 कोटी रुपये खर्चून 4.25 किमी बगलमार्ग बांधण्यात येणार आहे. बगलमार्गासाठी सध्या खोदकाम सुरू आहे. डिचोली पालिका क्षेत्रातील पिराचीकोंड-देवकीनगर भागातून जाणाऱ्या बगलमार्गात येणाऱ्या आणि डिचोली नदीला जोडणाऱ्या वाठादेव नदीच्या फाट्यावर पाईप बसवून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची तसेच जवळपासच्या भरावातील दगड-माती नदीत सरकत असल्याने नदीचे पात्र बुजत चालले आहे. नदीच्या पात्रात दगड, माती सरकत राहिल्यास नदी पात्र बुजून भविष्यात पुराची आपत्ती ओढवण्याची भीती नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

28 नोव्हेंबर रोजीच्या दै. ‘गोमन्तक’मधूनही या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आत्माराम गावडे, साहाय्यक अभियंता फिलिप यांच्‍यासह अन्‍य अधिकारी, नगरसेविका ॲड. रंजना वायंगणकर यांच्या समवेत सभापती श्री. पाटणेकर यांनी आज (बुधवारी) दुपारी संबंधित ठिकाणी जाऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी सभापती श्री. पाटणेकर यांनी अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती जाणून घेतली.

बगलमार्गासाठी सध्या खोदकाम करण्यात येत असून, मातीची वाहतूक करण्यासाठी नदीच्या फाट्यावर तात्पुरता मातीचा रस्ता करण्यात आला आहे. बगलमार्गाचे काम हाती घेण्यापूर्वी नदीच्या फाट्यावर पूल उभारण्यात येणार आहे. तसेच त्याठिकाणी असलेली माती पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. नदीत कोसळलेली दगड मातीही काढण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्री. गावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT