Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : कुंडईतील औद्योगिक वसाहतीत सापडली कवटी व हाडे...

घटनेमुळे परिसरात खळबळ : सापडली मानवी कवटी व 12 हाडे

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : कुंडई औद्योगिक वसाहतीमधील जंगल भागात मानवी कवटी व 12 हाडे सापडली आहेत. ही घटना दोन दिवसांपुर्वी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. दरम्यान, हे प्रकरण घातपाताचे असावे असा कयास व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. सापडलेले अवशेष पोलिसांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत. याबाबत फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती की, कुंडई औद्योगिक वसाहतीमधील जंगल भागात मानवी कवटी व काही हाडे सापडली. यासंबंधीची माहिती फोंडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कवटी व हाडे ताब्यात घेतली. पोलिसांनी मानवी अवशेष अधिक तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील फॉरेन्सिक विभागाकडे पाठवली. घटनास्थळी पोलिसांना एक शर्टही सापडला.

कुंडई औद्योगिक वसाहतीमधील घटनास्थळी पोलिसांना एक शर्टही सापडला आहे. त्यामुळे ही कवटी व हाडे एखाद्या पुरुषाची असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण घातपाताचे असावे. दुसरीकडे खुन करुन ही हाडे इथे आणुन टाकली असावीत का?असा कयास व्यक्त होत आहे. याबाबत फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी सांगितले की, याचे नमुने गोळा केले आहेत. अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'सोशल मीडिया'वरील मैत्री पडली महागात, आजारपणाच्या बहाण्याने 90 लाखांचा गंडा नंतर अत्याचार, आरोपी गजाआड

Goa Highways Development: महामार्गांवर तीन वर्षांत 2,320 कोटी खर्च, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचे माजी आमदार 'आप'च्या संपर्कात?

Digambar Kamat Ramesh Tawadkar Oath: दिगंबर कामतांना देव पावला, रमेश तवडकरांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ; आता खाती कोणती मिळणार याची उत्सुकता

Mumbai Cricket: मुंबई क्रिकेटमध्ये खळबळ! कर्णधारपदाचा राजीनामा दिला, खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

SCROLL FOR NEXT