Siddhesh Naik presiding over the Adarsh Parliament of IIDL Gomantak Digital Team
गोवा

आदर्श संसदेचे सहावे अधिवेशन उत्साहात

या अधिवेशनात हुजुराबादचे आमदार आणि तेलंगणचे माजी वित्तमंत्री ईटाला राजिंदर व उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक यांचा वक्ते म्हणून सहभाग होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : उत्तान, ठाणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रेटिक लिडरशीप (आयआयडीएल) यांचे आदर्श संसदेचे सहावे अधिवेशन 17 आणि 18 मे या कालावधीत आरएमपी-केईसी संकुलात उत्साहात पार पडले. या अधिवेशनात हुजुराबादचे आमदार आणि तेलंगणचे माजी वित्तमंत्री ईटाला राजिंदर व उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक यांचा वक्ते म्हणून सहभाग होता.

या अधिवेशनात आयआयडीएलचे पदव्युत्तर कार्यक्रमाचे एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना सत्ताधारी व विरोधी अशा गटात विभागण्यात आले होते आणि त्या भूमिकांना अनुसरून त्यांनी वादविवादात योगदान दिले.

वादविवाद आणि वक्तृत्व या माध्यमातून त्यांनी अस्सल संसदेचे वातावरण निर्माण केले. अधिवेशनाच्या सत्रात नवीन सदस्यांना शपथ देणे, प्रश्‍नोत्तरीचा तास, लक्षवेधी ठराव मांडणे, विधेयके मांडणे असे कामकाज झाले.

अधिवेशनात अलीगडचे हरीगड असे नामांतर करणे आणि मणिपूरमधील दंगली या मुद्द्यांवर लक्षवेधी ठराव मांडण्यात आले. तसेच तीन महत्वाची विधेयके मांडण्यात आली. त्यात राष्ट्रीय नागरीक नोंदणी (एनआरसी), दुसरे वित्त विधेयक होते व तिसरे संसदेत युवकांना 33 टक्के आरक्षण अशा विधेयकांचा समावेश होता. अलीगड नामांतर आणि एनआरसी या ठरावांवर जोरदार युक्तीवाद करण्यात आले.

आदर्श संसदेचे अध्यक्षस्थान भूषविताना आपल्याला आनंद झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभागी होऊन केलेले युक्तीवाद प्रशंसनीय होते. या अधिवेशनातून आपल्यालाही काही गोष्टी अनुभवता आल्या. -सिद्धेश नाईक, अध्यक्ष-उत्तर गोवा जिल्हा पंचायत

आयआयडीएल ही एक आगळी अशी संस्था आहे आणि येथे युवकांमध्ये लोकशाही मूल्ये बिंबवली जातात. येथील आदर्श संसदेच्या माध्यमातून युवकांना संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येतो.

-देवेंद्र पै ,आयआयडीएलचे अभ्यासक्रम संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT