Panajim Fire News : चिंचोळे येथील आगीत तब्बल 20 लाखांचे नुकसान

चिंचोळे - भाटले येथे गोदामांना भीषण आग लागली होती
Panaji Fire
Panaji FireDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Fire News : चिंचोळे - भाटले येथील सरकारी प्राथमिक शाळेसमोरील वस्तीच्या मागील बाजूला असलेल्या गोदामांना भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामातील डेकोरेटर्सचे सामान तसेच चप्पल्स व शूज मिळून सुमारे 20 लाखांचे सामान खाक झाले. ही आग मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास लागली व ती विझवण्यासाठी सुमारे पाण्याचे तीन बंब वापरण्यात आले.

आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे. या गोदामाच्या बाजूलाच वस्ती आहे व ही आग घराच्या स्वयंपाक खोलीपर्यंत पोहचली होती. ही आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली अशी माहिती पणजी अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.

Panaji Fire
Goa Assembly Session 3rd Day: 'मनोहर', 'पर्रीकर' नावावरून गोंधळ; उद्यापर्यंत सभागृह तहकूब

चिंचोळे येथे शेख जियाझ अहमद, शेख रियाझ अहमद व शेख मुबिन यांची वेगवेगळी एकमेकाला लागून घरे आहेत. या घरांच्या मागील बाजूला त्यांनी सामान ठेवण्यासाठी गोदामे केली होती. या गोदामामध्ये डेकॉरेटर्सचे सामान त्यामध्ये पंखे, पडदे व अलिशान खुर्च्या तसेच चप्पल्स व शूज हे ठेवण्यात आले होते.


रात्री अचानक 12 वाजण्याच्या सुमारास या गोदामातून आगीचे ज्वाला बाहेर येऊ लागल्या व काही क्षणातच या आगीचा पसारा वाढला. गोदामातील सामान बाहेर काढण्याचीही संधी मिळाली नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

Panaji Fire
Goa - Mumbai Highway Accident : पेडणे येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक ठार

आग लागलेली गोदामे ही घरांच्या मागील बाजूला असल्याने तसेच तेथे दाट वस्ती असल्याने पाण्याचा बंब नेण्यासाठी जवानांना मुष्किल झाले. अखेर पाण्याचे पाईप त्या गोदामापर्यंत नेऊन पाण्याची फवारणी सुरू झाली. आग मोठ्या प्रमाणात लागल्याने आणखी पाण्याचे बंब मागवण्यात आले.

सुमारे साडेतीन तासानंतर ही आग नियंत्रणात आणण्यास जवानाने यश आले मात्र तोपर्यंत सर्व सामान जळून खाक झाले होते. गोदामाच्या मालकांनी सुमारे 20 ते 25 लाखांचे नुकसानीचा दावा केला आहे. दलाचे अधिकारी देसाई यांनी वीज खात्याला या आगीचे कारण शोधून काढण्यासाठी पत्र पाठवले आहे. तसेच गोदामाच्या मालकानी त्यांचा खाक झालेल्या सामानाची तसेच गोदामाच्या दस्तावेजाची माहिती त्यांनी मागितली आहे.

Panaji Fire
Fatorda: सराफ दुकानातून सोन्याचे 3.5 लाखाचे ब्रेसलेट चोरणाऱ्याला दाबोळी विमानतळावर अटक

मिळालेल्या माहितीनुसार घराच्या मागील वस्तीमध्ये ही गोदामे उभारण्यात आली होती. या गोदामासाठी आवश्‍यक असलेले परवाने नाहीत तसेच आग प्रतिबंधक उपकरणेही त्या ठिकाणी नव्हती.

या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून घरासमोर असलेल्या रस्त्याच्या बाजूने चप्पल्सची दुकाने थाटण्यात आली होती. ही दुकाने शाळेसमोरच असल्याने वाहतुकीला अडचणीचे ठरत होती. पणजी महापालिकेनेही त्याकडे दुर्लक्ष केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com