Panajim: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पणजीत एकावर गुन्हा दाखल

Crime News
Crime News Dainik Gomantak

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पणजीत (Panajim) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैगिंक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली, तिने एका बाळाला देखील जन्म दिला. मात्र, ते मुल वीस दिवसांत दगावले. दरम्यान, बेळगाव पोलिसांनी (Belgavi Police) याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची माहिती पणजी पोलिसांकडे (Panajim Police) सुपूर्द करण्यात आली आहे. (FIR registered against one person for allegedly raping 12 year minor girl at panaji KTC bus stand)

Crime News
Anjuna Police: गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिसातील तरूणाला अटक, 3.10 लाखांचा गांजा जप्त

पणजी पोलिसांनी बेळगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवर पणजी येथील केटीसी बस स्थानक परिसरात वारंवार बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. बेळगाव येथील एका रूग्णालयात पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला. मात्र, जन्माला आलेलं मुल वीस दिवसांत दगावले. अशी माहिती समोर आली आहे.

बेळगाव पोलिसांत महिलेने दिलेल्या तक्रारारीनंतर संबधित माहिती पणजी पोलिसांना दिली आहे. पणजी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Crime News
Goa Panchayat Election: 150 पेक्षा अधिक पंचायतीत फुलले 'कमळ'; मुख्यमंत्र्यांचा दावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com