Virat Khdapkar six year old Goa boy Kedarnath world record Dainik Gomantak
गोवा

Virat Khdapkar World Record: जिद्द, धैर्य आणि चिकाटी... गोव्याच्या 6 वर्षांच्या मुलाचा 'विराट' विक्रम, पायी गाठले केदारनाथ; 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

Virat Khdapkar Kedarnath: दाबोळी येथील सहा वर्षे सहा महिने दहा दिवसांच्या विराट शेखर खडपकर याने पायी केदारनाथ गाठत अनोखा विश्वविक्रम केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: दाबोळी येथील सहा वर्षे सहा महिने दहा दिवसांच्या विराट शेखर खडपकर याने पायी केदारनाथ गाठत अनोखा विश्वविक्रम केला. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्याची ‘यंगेस्ट टू रिच केदारनाथ’ म्हणून अधिकृत नोंद घेत प्रशस्‍तिपत्रक व पदक देऊन गौरव केला.

विराटने ५ मे २०२६ रोजी आई लक्ष्मा खडपकर, गोवा-मुंबईतील कुटुंबीय व मित्रांसोबत सुमारे २२ किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण केला. उणे ६ अंश सेल्सिअस तापमान, पाऊस आणि हिमवृष्टीचा सामना करत त्याने केदारनाथ मंदिर गाठले.

प्रवासादरम्यान डोके व पोटदुखीचा त्रास झाल्याने सुमारे चार तास त्याची प्रकृती बिघडली. मात्र, उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने हेलिकॉप्टरची गरज भासली नाही. नीलेश साळगावकर व संजय सातार्डेकर यांनी यावेळी मदत केली.

माजी मुरगाव नगराध्यक्ष शेखर खडपकर यांचा पुत्र विराट याने यापूर्वी गोव्यात पाच मॅरेथॉनही पूर्ण केल्या आहेत. त्याच्या या जिद्द, धैर्य आणि चिकाटीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT