

सांगे: ‘‘विचार करूनच युतीबाबतचा निर्णय घेतला जाईल. पण पुन्हा पक्षांतर होणार नाही, याची हमी कोण देणार?’ असा सवाल गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित करून काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला.
सरदेसाई यांनी कुशावती जिल्ह्यातील सांगे मतदारसंघात ‘जंय गाव, थंय हांव’ या उपक्रमाला सुरुवात केली. जांबावली येथे श्री दामोदर देवाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी विविध भागांत जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आडेवासीयांनी राज्यात युतीची गरज व्यक्त केली असता त्यांनी वरील सवाल केला.
आडे-रिवण, रिवण, कोळंब, कुयणामळ, वाडे-कुर्डी कॉलनी १ व २, नेत्रावळी, भाटी येथील नागरिकांशी सरदेसाई यांनी संवाद साधला. यावेळी संतोष गावकर, मेशू डिकॉस्टा, सिद्धेश प्रभुदेसाई, गोकुळदास गावकर, फौझिया शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.
आडे-रिवण पुलाच्या कामाची दखल
आडे-रिवण येथील ग्रामस्थांनी मनोहर पर्रीकर सरकारने पूल बांधून दिला; मात्र त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत प्रयत्न झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत सरदेसाई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.