Konkani Bhasha Mandal, Goa Dainik Gomantak
गोवा

Konkani Bhasha मंडळाचा सहा लेखकांना जीवनगौरव पुरस्कार

कोकणी भाषा मंडळ, गोवा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कोकणी भाषा मंडळ, गोवा 60 वा वर्धापन दिन (Konkani Bhasha Mandal, 60th anniversary) साजरा करत आहे. 30 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर या कालावधीत रवींद्र भवन, मडगाव (Ravindra Bhavan, Margao) येथे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. यावेळी सहा लेखकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

(Konkani Bhasha Mandal, Goa is celebrating its 60th anniversary from September 30 to October 1)

कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लेखक आणि स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईच्या डीन डॉ. अश्वनी कुमार (Dr. Ashwini Kumar) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या लेखकांचा होणार सन्मान

लेखक दामोदर मौझो, पुंडलिक नाईक, नागेश करमाळी, उदय भेंबरे, मीना काकोडकर आणि हेमा नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यावेळी गायिका लोर्ना कॉर्डेरो (Singer Lorna Cordeiro) आणि पं अजितकुमार कडकडे, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, उद्योगपती आणि समाजसेवक अवधूत टिंबलो, दत्तराज साळगावकर, श्रीनिवास डेम्पो आणि कमलाक्ष नाईक यांना कोकणी भाषा मंडळाचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात येणार आहे.

मंडळाच्या हीरक महोत्सवाचा भाग म्हणून ‘कोकणी’ या विशेषांकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. औपचारिक कार्यक्रमानंतर रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर, मडगाव यांच्या संकल्पनेतून साकारलेले एक संगीत नाटक सादर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT