Mormugao Coal: मुरगाव बंदरातील कोळसा वाहतूक बंद करा- शंकर पोळजी

कोळशावर पैसा कमवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये
Coal Transportation
Coal Transportation Dainik Gomantak

Mormugao Coal: मुरगाव बंदरातील कोळसा वाहतूक बंद करावी अशी मागणी समाजसेवक शंकर पोळजी यांनी केली आहे. कोळसा वाहतूक करताना बेजबाबदार वाहतूक केल्याने कोळसा रस्त्यावर पडला जातो. यामुळे वाहन रसत्यावर अपघातांना निमंत्रण दिले जात तसेच, प्रदुषणात देखील वाढ होते. असे शंकर पोळजी यांनी म्हटले आहे.

बायणा फ्लायओव्हर वरून कोळसा वाहतूक करताना रसत्यावर पडलेला कोळसा समाजसेवक शंकर पोळजी यांनी गोळा केला.

मुरगांव बंदरातील कोळसा वाहतूक रस्ता मार्गे नवीन चौपद्री महामार्गावरून केली जाते. पण, कोळसा वाहतूक करताना ट्रक मधून कोळसा भर रस्त्यात सांडत असतो, याचे भान मात्र त्या ट्रक चालकाला राहत नाही. नवीन राष्ट्रीय महामार्गावर सडा ते वरूणापुरी या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा रस्त्यावर सांडत असतो. कोळसा रस्त्यावर पडल्याने त्याच्या भूकटीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. तसेच, हवेतील प्रदूषणात देखील वाढ होत आहे. असे समाजसेवक शंकर पोळजी यांनी म्हटले आहे.

Coal Transportation
Pipeline Burst : जलवाहिनी फुटल्याने ‘भाटले’ जलमय

कोळसा आरोग्यासाठी घातक असतो, त्यातून येणाऱ्या धुरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. समाजसेवक शंकर पोळजी यांनी या कोळशा विरोधात नाराजी व्यक्त केली. मुरगाव बंदरातील कोळशामुळे अनेक लोकांच्या जीवितास हानी पहोचली आहे. नानाविध रोग तयार होऊन लोकांना त्रास होत आहे. तेव्हा ही कोळसा वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी पोळजी यांनी केली आहे. कोळशावर पैसा कमविण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळू नका असे आवाहन पोळजी यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com