Ashwem Temple Lock Update Dainik Gomantak
गोवा

Ashwem News: अखेर वाद आटोक्यात!! दोन्ही गटांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक

North Goa: उद्या ( दि. ४ ऑक्टोबर) रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दोन्ही गटांची १ वाजता आणखीन एक बैठक होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आज उत्तर गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. एका अज्ञाताने अश्वे येथील श्री भूमिका मंदिराला टाळे ठोकल्यामुळे स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

काल म्हणजेच बुधवारी (०२ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मंदिराच्या दरवाज्याचे टाळे बघून स्थानिक जमा झाले आणि त्यांच्यामध्ये गटबाजी निर्माण होत दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप करायला सुरुवात केली.

मंदिराचा जुना टाळा बदलून त्याजागी नवा टाळा रात्री दोनच्या सुमारास लावल्याचा आरोप गावातील एका गटाने केला, तर दुसऱ्या गटाने नवरात्रीच्या निमित्ताने सुरक्षेच्या काराणास्तव टाळा लावण्याची माहिती दिली. या वादामुळे पोलिसांची एक फौज तैनाद करण्यात आली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार उपजिल्हाधिकारी आणि एसडीपीओ जिवबा दळवी यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे पेडण्यातील वाद आटोक्यात आला आहे. आज अश्वे येथील मंदिरात दोन्ही पक्षांसोबत एक बैठक घेण्यात आली जिथे दोन्ही पक्षांना काही सूचना देण्यात आल्या आहेत, दरम्यान दोन्ही गटांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. तसेच उद्या ( दि. ४ ऑक्टोबर) रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दोन्ही गटांची १ वाजता आणखीन एक बैठक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT