Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral Resigns: काब्राल ‘आऊट’; सिक्वेरा मैदानात! वर्षापूर्वी भाजपने दिलेल्‍या आश्‍‍वासनाची अखेर पूर्ती

Goa PWD Minister Nilesh Cabral resigns: पायउतार होताना काब्राल यांना पर्रीकरांची आठवण खातेबदल होण्‍याची शक्‍यता, काही मंत्र्यांची ‘फिल्‍डिंग’

दैनिक गोमन्तक

Goa PWD Minister Nilesh Cabral resigns: नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदाच्या दिलेल्‍या आश्‍‍वासनाची पूर्तता करण्यासाठी तब्‍बल वर्षभरानंतर मुहूर्त साधलेल्या भाजपने अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेतला. त्‍यामुळे गेल्‍या दोन दिवसांपासून सुरू झालेल्‍या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला.

सिक्वेरा यांना आज (रविवारी) संध्‍याकाळी 7 वाजता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. राजभवनाच्या जुन्या दरबार सभागृहात झालेल्‍या या समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती.

सिक्वेरा यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. दरम्‍यान, सिक्वेरा यांना वीज आणि उद्योग खाते मिळण्‍याची शक्‍यता आहे.

दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, रुडाल्फ फर्नांडिस, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर आणि आलेक्स सिक्वेरा हे आठ आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते.

त्‍यापैकी दिगंबर कामत, संकल्प आमोणकर आणि आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदे दिली जातील अशी चर्चा गेले तीन-चार महिने सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्‍हती.

पक्षप्रवेशावेळी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती त्यांच्याच माध्यमातून व्हावी अशी सोयीस्कर भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फेररचनेची चर्चा होऊनही विषय पुढे सरकत नव्हता.

आताही दिगंबर कामत यांनी सिक्वेरांच्या समावेशाचा आग्रह धरल्याने तातडीने ही सारी प्रक्रिया करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सासष्टीतील एकाला तरी मंत्रिपद मिळावे असा आग्रह धरण्‍यात आला होता. भाजपचे राज्य सरचिटणीस दामोदर नाईक आणि दिगंबर कामत यांचे सख्य अलीकडे कमालीचे वाढले आहे.

त्यामुळेच कामत यांना दिल्लीतील भाजप नेतृत्वापर्यंत या भावना पोचवणे सोपे झाले आणि अखेर काब्राल यांचा राजीनामा घेतानाच सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ देत या विषयाला तूर्त विराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी मंत्री नियुक्तीचा आदेश वाचून दाखवला. शपथविधीनंतर कुणबी शाल व पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांनी तर पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी सिक्वेरांचे अभिनंदन केले.

फेरखातेवाटप करण्‍याची शक्‍यता

आलेक्‍स सिक्वेरा यांच्याकडे मुख्यमंत्री कोणती खाती सोपविणार याविषयी कमालीची उत्सुकता आहे. वीज आणि उद्योग ही खाती अनुक्रमे सुदिन ढवळीकर व माविन गुदिन्हो यांच्याकडे आहेत. ती खाती सिक्वेरांकडे सोपविण्यासाठी फेरखातेवाटप करावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, आताच कुठे शपथविधी झाला आहे. मला विचार तरी करू द्या. एक-दोन दिवसांत खातेवाटप करू. काब्राल यांच्याकडीलच खाती सिक्वेरांकडे सोपवणार का? असे विचारल्यावर ‘पाहू’ असे उत्तर त्यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT