Sattari Charavane Waterfall Dainik Gomantak
गोवा

Sattari Charavane: पावसाचा अलर्ट असूनही अभ्‍यास सहल का? स्थानिक वेळेत पोचले नसते तर...

Sattari Charavane Waterfall Accident: हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलेला असताना या भागातील विद्यार्थ्यांनास्टडी- टुरसाठी घेऊन जाण्याचा हायस्कूल व्यवस्थापनाचा निर्णय योग्य होता काय? पालकांचा संतापजनक सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Charavane News

वाळपई,: सत्तरीत सहलीला गेलेल्या व्‍यक्‍ती पाणी वाढल्‍याने अडकण्‍याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी ७ जुलै रोजी पाली-सत्तरी येथे धबधब्यावर १५०हून पर्यंटक अडकून पडले होते. आज चरावणे-सत्तरी येथे शिवोली येथील वर्षापर्यटनासाठी आलेल्या सेंट झेविअर उच्च माध्यमिक विद्यालयाचे ४७ विद्यार्थी व ५ शिक्षक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडकून पडले होते.

सकाळी ११ च्या सुमारास ते चरावणे येथे पोचल्यानंतर अर्धा तास चालत ते चरावणे धबधब्याच्या ठिकाणी पोचले. सकाळपासून आकाश कोरडे होते. पाऊस नव्हता. येथे आलेल्यांनी धबधब्यांवर आनंद लुटला. त्यात दुपारी २ च्या सुमारास पाऊस पडू लागला. यावेळी त्यांनी परतीचा मार्ग धरला असता नदी ठिकाणी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदी ओलांडून येणे त्यांना जमले नाही. त्यांमुळे सर्व जण येथे अडकून राहिले.

या भागात काही ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने संपर्क करणेही काही प्रमाणात अडथळा आला मात्र. येथे असलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांना स्थानिकांशी संपर्क साधला. तसेच वन खात्याचे कर्मचारी, वाळपई पोलिस, वाळपई अग्निशमन यांचा कळविण्यात आला.

त्यात पंच व इतरांनी तातडीने धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. एकूण धबधब्यावर जाण्यासाठी अर्धा तासाची वाट आहे. त्यामुळे डोंगरमाथ्यावर जाण्यास वेळ लागतो. मात्र बचावासाठी सर्व यंत्रणेने तातडीने सहकार्य करत सर्व विद्यार्थी, शिक्षक आदींना सुखरूप बाहेर वाढले. यात स्थानिक नागरिक, वन कर्मचारी, पोलिस व अग्निशमन दलांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

वाळपई भागात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी तेवढा पावसाचा जोर नाही आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोंगरमाथ्यावर म्हणजे कर्नाटक बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने घाटमाथ्यावरून येणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी वाढली. वाळवंटी, म्हादई, आदी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. घोटेली केरी सत्तरी, वेळुस नदी, म्हादई आदी नदीच्या पाण्याची पातळीत वाढली. यावेळी वाळपई पोलिस, अग्निशमन दल यांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने उपाययोजना करून सर्वांची सुखरूप सुटका केली आहे.

पालकांना भरले होते कापरे!

शिवोलीतील एस. एफ. एक्स उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा एक गट तसेच पाच शिक्षक मिळून ४० जणांचा चमु सत्तरीतील चरवणे धबधबा परिसरात अभ्‍यास सहलीसाठी गेले होते. यावेळी अचानक आलेल्‍या पाण्‍यामुळे जी धांदल उडाली ती कळताच पालक गर्भगळीत झाले. विद्यार्थी, शिक्षक यांची अग्‍निशमन दलाने सहिसलामत सुटका केल्‍यावर त्‍यांचा जीव भांड्यात पडला.

तत्‍पूर्वी पालकांसमोर २००२चा भयानक प्रसंग उभा राहिला, शिवोलीतील एस.एफ.एक्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा त्यावेळी स्टडी टुरवर निघालेल्या एका घटनेत त्यावेळी दांडा-शिवोली येथील दोघां विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने त्यावेळी संपूर्ण गावांवर शोककळा पसरली होती.

रविवारी सकाळीच हवामान खात्याकडून सोमवार आणि मंगळवार या दिवसांसाठी ऑरेंज तसेच रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असताना या भागातील विद्यार्थ्यांना चरवणे-सत्तरी सारख्या नवख्या ठिकाणी स्टडी- टुरसाठी घेऊन जाण्याचा हायस्कूल व्यवस्थापनाचा निर्णय योग्य होता काय? असा संतापजनक सवाल विद्यार्थ्यांचे पालक विचारत होते. शिक्षण खात्याकडून या घटनेची गंभीर दखल घेण्‍याची मागणी होत आहे.

सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान टुरवर गेलेले सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग शिवोलीत पोहोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT