Goa Rain: गोव्यात पावसाचा जोर; चरावणे धबधब्यावर अडकलेल्या 47 मुलांची सुखरुप सुटका

Heavy rainfall in Goa: चरावणे सत्तरीत धबधब्यावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका
Heavy rainfall in Goa: चरावणे सत्तरीत धबधब्यावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका
Rescue Operation at Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi,Goa

वाळपई: गोव्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरु होता. काही काळ थांबलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. आज सत्तरी तालुक्यातील चरावणे या गावात शिवोलीतील St. Francis Xavier's उच्च माध्यमिक विद्यालयाची 47 मुले पावसाचा जोर वाढल्याने धबधब्यावर अडकून पडली होती.

अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच ते वेळ न दवडता घटनास्थानी पोहोचले आणि त्यांनी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत पोहोचवायला सुरुवात केली.

अचानक वाढलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी देखील वाढली होती आणि परिणामी 11वी आणि 12वीत शिकणारी मुलं अडकली, मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या कार्यकुशलतेमुळे सर्व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी गोव्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानुसार पावसाने पुन्हा जोर पकडल्याचे चित्र स्पष्ट आहे. स्थानिकांच्या मते कित्येक गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा गोव्यात पावसाचा जोर अधिक आहे.

Heavy rainfall in Goa: चरावणे सत्तरीत धबधब्यावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका
Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com