Teacher Award Dainik Gomantak
गोवा

Siolim: पर्यावरण प्रेमी शिक्षक डायगो पींटो यांना राज्य पुरस्कार जाहीर

''जेष्ठ शिक्षक डायगो पींटो यांनी केवळ शब्दाने विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले''

दैनिक गोमन्तक

केवळ शब्दाने प्रेम, आपुलकी आणि शिस्त लावण्याचे धडे जेष्ठ शिक्षक डायगो पींटो यांनी विद्यार्थ्यांना दिले. राज्य सरकारकडून राज्य शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला असून त्यांच्यामुळेच आज शिवोली पंचक्रोशीचे नाव शैक्षणिक क्षेत्रात चमकत आहे. शिवोलकरांना त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे मत शिवोली येथील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक तसेच अध्यक्ष निलेश वेर्णेकर यांनी सांगितले.

(Siolim Goa State Teacher Award announced to Diego Pinto)

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डायगो पींटो यांचा येथील मठाच्या सभागृहात नुकताच सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शांत, संगिताचा ध्यास घेतलेले डायगो पींटो विद्यार्थ्यांना नेहमी आपलेसे वाटतात. शिक्षणाबरोबरच पर्यावरण आणि निसर्गाशी जवळचे नाते सांगणारे पींटो सर यांनी आपले जीवनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी बहाल केले होते, निसर्गाशी असलेल्या प्रेमापोटीच त्यांनी सातत्याने तीस वर्षे शिवोलीत प्लांट फेस्टीवल हा उपक्रम यशस्वीपणे राबविला होता. त्यामुळे त्यांचे निसर्ग प्रेम अबाधित असल्याचे जेष्ठ शिक्षक देवेंद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यक्रम अध्यक्षपदी निलेश वेर्णेकर यांनी भुषवले. यावेळी, व्यासपीठावर मार्ना- शिवोली पंचायतीचे उप-सरपंच विदीर्ण फर्नांडिस, समर्थन संघटणेचे अध्यक्ष प्रेमानद आरोलकर, नितीन आगरवाडेकर, कमल ताम्हणकर, माजी क्रिडापटू किशोर पोबुर्फेकर, जेष्ठ शिक्षक देवेंद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

SCROLL FOR NEXT