नवेवाडे वास्कोत वालंकिणी सायबिणीचे फेस्त उत्साहात

यंदा कोरोनास्थिती नियंत्रणात असल्याने सणाला मिळाला उजाळा
Velankanni festival
Velankanni festivalDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: नवेवाडे वास्को येथे वालंकिणी सायबिणीचे फेस्त कोरोना नियमावलीचे पालन करत मोठ्या उत्साहात 8 सप्टेंबर रोजी साजरे करण्यात येत आहेत. त्यानिमित्त गेला आठवडाभर नोव्हेना सुरू होत्या. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे फेस्त मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले नव्हते. मात्र यंदा परिस्थिती नियंत्रणात असल्याने सणासुदीला उजाळा मिळाला आहे.

(Annual Velankanni festival celebrated with enthusiasm in Vasco)

Velankanni festival
Goa Dairy: पशुखाद्य प्रकल्पात स्फोट, दोषींवर कारवाई करण्याचा इशारा

त्यानुसार ख्रिस्ती बांधवांतर्फे वालंकिणी सायबिणीचे फेस्त साजरे करण्यात आले. यावेळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. प्रार्थना सभेनंतर बालगोपाळांतर्फे केक कापण्यात आला. नंतर केक कापून उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले.

Velankanni festival
Goa सरकारकडून शाळा विलिनीकरणाबाबत दिशाभूल

ख्रिस्ती बांधवांच्या वालंकिणी सायबिणीच्या नोवेनांना 30 ऑगस्ट पासून सुरवात झाली होती. विविध ठिकाणी प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान काल 8 सप्टेंबर रोजी वालंकिणी सायबिणीचे फेस्त साजरे करण्यात आले. गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम तसेच इतर धर्मियांच्या सणांवर विरजण पडले होते. त्यामुळे कोणत्याच प्रकारचा सण मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता.

यंदा कोरोना महामारीपासून काही प्रमाणात सुटकारा मिळाल्याने हळूहळू सणासुदीला उजाळा मिळत आहे. त्यानुसार लोक आपल्यापरीने सण साजरे करण्यास तयार झाले आहेत. वालंकिणी सायाबिणीच्या फेस्तानिमित्त ख्रिस्ती बांधव आठ दिवस प्रार्थना सभांचे आयोजन करून नवव्या दिवशी सायबिणीचे फेस्त साजरे करतात. त्यानुसार या नोवेनांना 30 ऑगस्ट रोजी सुरवात झाली. नवेवाडे वास्को येथील फर्नांडिस यांच्या घरासमोर स्थापन केलेल्या वालंकिणी सायबिणीच्या नोवेनाला 30 ऑगस्ट रोजी सुरवात झाली होती.

याकाळात संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत रोज प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. यात ख्रिस्ती बांधवांबरोबर हिंदू, मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रार्थनासभेत सहभागी होऊन नोवेना साजरे करण्यात आली. प्रत्येक दिवशी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत प्रार्थनासभा झाल्या. प्रत्येक दिवशी सर्वधर्मीय लोक आपल्यापरीने सायबिणीला साडी, हार किंवा फळे भेट म्हणून देण्यात आली.

डॉम्निक फर्नांडिस यांनी या सायबिणीची मूर्ती चेन्नई येथील पवित्रस्थान वालंकणी येथून आणून तिची 12 वर्षांपूर्वी स्थापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अविरत सेवा सुरू आहे. या उत्सवात सर्वधर्मीय लोक सहभाग घेतात. काल गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी वालंकीणी सायबिणीचे फेस्त साजरे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com