Plastic Ban Movement At Sanquelim  Dainik Gomantak
गोवा

Plastic Ban: ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरणाऱ्यांना साखळीत दणका; जागृतीनंतर करणार दंडात्मक कारवाई

Sanquelim: सिंगल यूज प्लास्टिक देणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबरच आता ती मागणाऱ्या ग्राहकांनाही साखळी पालिका दंड देणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Plastic Ban At Sanquelim

साखळी: सिंगल यूज प्लास्टिक देणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबरच आता ती मागणाऱ्या ग्राहकांनाही साखळी पालिका दंड देणार आहे. या विषयी बाजार परिसरात २१ दिवस जागृती केल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम केवळ साखळी स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नसून साखळीवासीयांना व बाजारात येणाऱ्या लोकांना कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून वाचविण्यासाठी आहे, असे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी सांगितले.

गोवा कचरा व्यवस्थापन मंडळ, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, मिनरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व गोदरेज कंपनीच्या सिएसआर अंतर्गत साखळी बाजारात जागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

येत्या २१ दिवसांत ही जागृती करत असतानाच कोणकोणत्या सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालू शकते यावर चर्चा करणार. तसेच सर्वांना बरोबर घेऊन जागृती मार्गदर्शनही करणार व नंतरच दंडात्मक कारवाई सुरू करणार असेही प्रभू यांनी सांगितले. यावेळी मिनरल फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका श्रध्दा रांगणेकर यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. बाजारात विक्रेत्यांकडे फिरून मार्गदर्शन करण्यात आले.

दुकानदारच नव्हे पिशव्या मागणारेही जबाबदार

साखळी बाजारात या संदर्भात जागृती करणारी भित्तिपत्रके प्रत्येक दुकानावर चिकटविण्यात येत आहेत. तसेच दुकानदारांनाही याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन करण्यात येत असून प्लास्टिकच्या जास्त वापरासाठी केवळ दुकानदारच जबाबदार नसून साहित्य घेतल्यानंतर पिशव्या मागणारे तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे दुकानदारांचा नाइलाज होत असतो. त्यासाठी ग्राहकांनीही बाजारात येताना कापडी पिशव्या घेऊन याव्यात, असे आवाहन नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sand Mafia Raj: गोव्यातील गोळीबाराची देशात चर्चा; 'एक्स'वर वाळू माफिया राज हॅशटॅग ट्रेन्डिंग

'तूफ़ान समुंदर के न दरिया के भँवर देख'! 19 तास, 94 किलोमीटर अंतर! प्रतिकूल हवामानात 'आर्यन'ने पार केला गोव्याचा समुद्र

Soha Ali Khan: 'गर्ल गँग'सोबत सोहाची पूलसाईड धमाल, गोवा ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर हिट!

India vs Australia T20I Series: सूर्या ब्रिगेडला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांतून स्टार अष्टपैलू बाहेर; बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट

साखळीनं बांधून मारहाण केली, 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आईने फोडला हंबरडा; मडगाव पोलिसांवर केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT