Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Goa News : तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. समान नागरी कायद्याबाबत एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी गोव्यात लागू असलेल्या समान नागरी कायद्याचा उल्लेख करून गोव्याचे कौतुक केले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

पणजी, लोकसभा निवडणुकीतील चार टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. मतदानाचे तीन टप्पे अद्याप बाकी आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक प्रचार सभा, रोड शो यांचा धडाका लावला आहे.

तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. समान नागरी कायद्याबाबत एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी गोव्यात लागू असलेल्या समान नागरी कायद्याचा उल्लेख करून गोव्याचे कौतुक केले.

आता लोक म्हणू लागले आहेत की, वन नेशन-वन लँग्वेज, वन नेशन-वन ड्रेस, वन नेशन-वन फूड या दिशेने भारताची सध्याची वाटचाल सुरू आहे. यावर तुमचे मत काय आहे? या प्रश्‍नावर पंतप्रधान मोदी यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘असे म्हणणाऱ्यांना तुम्ही हे नॅरेटिव्ह कुठून आणले, असा उलट सवाल केला पाहिजे.

‘यूसीसी’बद्दल जाणून घ्या!

पंतप्रधान मोदी म्हणाले की, समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्यांनी समान नागरी कायद्याबद्दल जाणून घेतले आहे का? समान नागरी कायदा म्हणजे काय? या देशाकडे यासंबंधीचे उत्तम उदाहरण आहे.

गोव्यात समान नागरी कायदा आहे. मला सांगा, गोव्यातील लोक एकसारखे कपडे घालतात का? गोव्यातील लोक एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ खातात का? या लोकांनी समान नागरी कायद्याबद्दल पोरखेळ चालवला आहे का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dindi Utsav: 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Goa Opinion: आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

SCROLL FOR NEXT