Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

Sattari Masorde: सत्तरी हा केवळ एक तालुका नसून, सत्तर गावांनी वेढलेली, रानवनांनी, नद्यांनी आणि डोंगरदऱ्यांनी नटलेली एक जिवंत संस्कृती आहे.
Sattari Masorde
Sattari MasordeDainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरी हा केवळ एक तालुका नसून, सत्तर गावांनी वेढलेली, रानवनांनी, नद्यांनी आणि डोंगरदऱ्यांनी नटलेली एक जिवंत संस्कृती आहे. इथली हिरवीगार निसर्गसंपदा ही जणू वरदहस्त ठरली आहे.या गावांपैकीच एक मासोर्डे या माझ्या गावाबद्दल काय सांगू. सत्तरीतील प्रत्येक गावाला ग्रामदेवतांचा आश्रय आहे, तसा मासोर्डे गावालाही आहे.

मासोर्डे हा गाव निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या गावची ओळखच तीर्थक्षेत्र म्हणून आहे. दरवर्षी अतिशय उत्साहात होणारा शिवरात्रोत्सव हा तर इथल्या सानथोरांचे आकर्षण. या गावच्या मातीतच एकप्रकारच्या आपुलकीने ओथंबलेला ओलावा आहे.

वेळूसचे रवळनाथ मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तसे ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेव मंदिर, पर्ये-सत्तरीचे भूमिका मंदिर, घनदाट जंगलात वसलेले श्री देव भावेश्वर मंदिर – ही सर्व मंदिरे आमच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा आधार आहेत.

कदंबकालीन गजलक्ष्मीच्या मूर्ती, कोदाळ-सत्तरीतील औषधी वनस्पती, कोपार्डे येथील श्री ब्राह्मणी महामाया देवस्थानात होणारे त्वचारोगावरील उपचार ही सत्तरीची ओळख आहे, तशी मासोर्डे गावातही एक औषध पाण्याची झर आहे, या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचारोग नाहीसे होतात. त्यामुळे अनेकांची मासोर्डेकडे रिघ लागते.

सत्तरी कृषीप्रधान भाग असून काजू, भाजीपाला, बागायती आणि कुळागर ही इथली जीवनरेखा आहे. आजही बहुतांश गाव शेतीवर अवलंबून आहे. जानेवारीपासून नव्या जोमाने शेतकरी पुन्हा भाजीपाला लागवडीच्या तयारीला लागतो.

Sattari Masorde
Sattari Crime: ..तो चालत जात होता, बाजूलाच गोळी झाडल्याचा आवाज आला; पडोसे सत्तरीत पोलिसांची चौकशी सुरु, गूढ वाढले

काळ बदलला आहे. पूर्वी गरिबी होती, पण समाधान होते. आज परिस्थिती अन् उत्पन्न बदलले, राहणीमान बदलले पण चिंता वाढल्या आहेत. लोकसंख्या वाढ, जंगलतोड, रानटी प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान – ही आव्हाने आमच्या मासोर्डे गावासमोरही उभी आहेत. व्यसनांचे वाढते प्रमाण, सण-उत्सवांतील वाद, तरुणांचे गाव सोडून शहरांकडे होणारे स्थलांतर यामुळे गावपणाला तडे जात आहेत.

तरीही आशा संपलेली नाही. दशावतारी नाट्य, दिंडी, फुगडीसारख्या लोककला पुन्हा जिवंत होत आहेत. शाळांना आधुनिक दर्जा मिळतो आहे. रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्यसेवा सुधारल्या आहेत. जग वेगाने पुढे जात आहे.

Sattari Masorde
Sattari Theft: 1 नाही, 2 नाही.. तब्बल 5 दुकाने फोडली! केरी-सत्तरीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक चिंताग्रस्त

पैशाला महत्त्व वाढले असले, तरी मातीशी असलेलं नातं टिकवणं हीच खरी गरज आहे. आमच्या मासोर्डे गावची ओळख तिच्या निसर्गात, संस्कृतीत आणि माणुसकीत आहे. ही ओळख जपणं हीच ‘माझ्या गावच्या मातीत’ वाढलेल्या सर्वांची जबाबदारी आहे.

म्हाळू गावस, मासोर्डे-सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com