Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sara Tendulkar Viral Video In Goa: सारा तेंडुलकर गोव्यातील रस्त्यावर मित्रांसोबत चक्का बिअरची बाटली हातात घेऊन फिरताना दिसून आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Goa News | News Update
Sara Tendulkar viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या लेकीचा गोव्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सारा गोव्यात मित्रांसोबत रस्त्यावर फिरत असून, तिच्या हातात चक्क बिअरची बाटली दिसून आली आहे. थर्डी फर्स्टच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे सारा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लाखो देशी - विदेशी पर्यटक दरवर्षी गोव्यात दाखल होत असतात. यावर्षी देखील हजारो पर्यटकांनी गोव्यातील बीच, हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब गर्दीने गच्च भरले होते.

अशात सारा तेंडुलकरच्या गोव्यातील एका व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सारा तेंडुलकर गोव्यातील रस्त्यावर मित्रांसोबत चक्का बिअरची बाटली हातात घेऊन फिरताना दिसून आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Goa News | News Update
Tillari Canal: ‘तिळारी’च्या पाण्याचा होणार प्रभावी वापर! सल्लागार नियुक्तीची निविदा; 64 गावांचे सखोल विश्लेषण केले जाणार

सारा आणि तिचे तीन मित्र गोव्यातील आरोशी समुद्रकिनारी दिसल्याचे समोर आलेल्या व्हिडिओतून दावा करण्यात आला आहे. साराच्या हातात मोबाईल फोन आणि बिअरची बाटली देखील दिसत आहे. यामुळे साराच्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीये.

Goa News | News Update
Coal Handling: मुरगाव बंदरातून कोळसा हाताळणीत वाढ! मालवाहतुकही 25 टक्क्यांनी वधारली; दक्षिण-पश्चिम रेल्वेची सरस कामगिरी

सचिन तेंडुलकरने कधीच तंबाखू, सिगारेट, पान मसाला किंवा दारुचे प्रमोशन केले नाही. पण, सचिनला त्याच्या मुलीला यापासून दूर ठेवता आल्याचे दिसत नाही. सारा हातात बिअरची बाटली घेऊन मित्रांसोबत गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली एक पोस्ट एकाने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

Goa News | News Update
Assnora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

साराच्या समर्थनात देखील अनेकांनी पोस्ट केल्या आहेत. "सारा आता मोठी झाली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनियता राखण्याचा अधिकार आहे. हातात बिअर असल्याने तिच्या चारित्र्य ठरवले जाऊ शकत नाही. विषारी कमेंट करणे बंद करा", अशी एक पोस्टही एक्सवर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com