Silly Souls Café and Bar | Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

सिली सोल्स प्रकरणी नवा खुलासा! हॉटेलचा FDI परवाना स्मृती इराणी यांच्या पतीच्या नावे

माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील वादग्रस्त बनलेल्या सिली सोल्स बार आणि रेस्टॉरंट (Silly Souls Bar And Restaurant) प्रकरणात आता एक नवा खुलासा समोर आला आहे. हॉटेलसाठीचा अन्न आणि औषध परवाना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचे पती झुबिन इराणी (Zubin Irani) यांच्या भागिदारी असलेल्या कंपनीच्या नावे आहे. अशी माहिती सिली सोल्स प्रकरणी तक्रार करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज (Aires Rodrigues) यांनी म्हटले आहे.

आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले, सिली सोल्स कॅफे आणि बार हे हॉटेल, आसगाव मधील सर्वे क्रमांक 236/22 अंतर्गत सर्वेक्षण केलेली मालमत्तेत असून अँथनी डिमागा यांच्या नावावर आहे. 01 जानेवारी 2021 पासून ती पन्नास हजार रूपयांच्या मासिक भाड्यावर झुबिन इराणी यांच्या भागिदारीत असलेल्या एइटोल फूड अँड बेव्हरेजेस एलएलपी यांना भाड्यावर देण्यात आली. यासाठी लागणारे विविध परवाने ही याच कंपनीच्या नावाने मागविण्यात आले असून, ही भागिदारीतील कंपनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांच्या नावावर आहे. यापूर्वी स्मृती इराणी यांनी हे हॉटेल आपल्या मुलीचे नाही असा दावा केला होता.

सध्या या हॉटेलसाठी मिळालेला अबकारी परवान्याबाबत राज्य सरकारची अबकारी खात्याकडे सुनावणी सुरू आहे. या हॉटेलच्या विरोधात आसगाव पंचायत, पंचायत संचालनालय, नगर नियोजन यासह महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. अबकारी खात्याकडे केलेल्या तक्रारीवर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT