अळंबी gomantak digital team
गोवा

Dicholim News : डिचोलीत अळंब्यांचे दर्शन

सहाशे रुपये वाटा : रस्त्याच्या बाजूला खरेदीसाठी झुंबड; हातोहात खप

Ganeshprasad Gogate

डिचोली : निसर्गाच्या नियमाप्रमाणे पावसाळ्यात रानावनांत वारूळावर उगवणारी ‘अळंबी’ म्हटली, की प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटते. रुचकर असलेल्या या अळंब्यांचा वर्षातून एकदा तरी आस्वाद घ्यायला मिळावा, यासाठी खवय्यांचा आटापिटा असतो. पावसाळ्यात वारूळावर उगवणाऱ्या अळंब्यांचे अखेर डिचोलीत दर्शन झाले.

डिचोली-साखळी रस्त्याच्या बाजूने कारापूर-तिस्क परिसरात सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात नसली, तरी ‘अळंबी’ विक्रीस उपलब्ध होती. ‘अळंबी’ म्हटल्याबरोबर खवय्यांच्या जिभेला पाणी सुटले आणि खरेदीसाठी झुंबड उडाली. निसर्ग नियमानुसार दरवर्षी साधारण आषाढी एकादशीच्या काळात अळंबी उगवण्याचे दिवस असतात. गेल्याच आठवड्यात आषाढी एकादशी साजरी झाली आहे. गेल्या वर्षी मात्र आषाढी एकादशीला जवळपास आठ दिवस असतानाच, डिचोलीत अळंब्यांचे दर्शन झाले होते.

सोमवारी डिचोली-साखळी रस्त्यावरील कुळण-कारापूर परिसरात ‘अळंबी’ विक्रीस उपलब्ध झाली होती. गेल्या दहा दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे पोषक वातावरण तयार होऊन अळंबी उगवलेली आहेत. असा जाणकारांनी अंदाज वर्तविला आहे.

महाग असूनही मागणी

सोमवारी सायंकाळी कारापूर-तिस्क परिसरात अळंबी विक्रीस उपलब्ध होती. रस्त्याच्या बाजूने एक विक्रेता अळंबी विकत होता. रस्त्यावरून ये-जा करणारे वाहने थांबवून अळंबी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत होते. महाग असतानाही अळंब्यांना तेजी आली होती. ६०० रुपये वाटा या दराने विक्री चालू होती. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक वाट्यात जेमतेम ४० ते ४५ अळंबी होती. मागणी असल्याने या अळंब्यांची हातोहात विक्री झाली.

काहींची निराशा

अळंबी खरेदीसाठी आलेल्या काहीजण निराश होऊन परतावे लागले. सत्तरी तालुक्यातील रानातून ही अळंबी विक्रीस आली होती. गेले दहा दिवस पडलेल्या पावसामुळे त्यातच ऊन पडल्याने अळंबी उगवली, असे संबंधित विक्रेत्याने सांगितले. कडक ऊन पडल्यास पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अळंबी बाजारात येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT