siddhi naik's birthday Dainik Gomantak
गोवा

वाढदिवशी 'लेकीच्या' आठवणीने कुटुंबीय झाले भावूक

युवा काँग्रेसकडून श्रद्धांजली; सरकारवर टीकास्त्र

दैनिक गोमन्तक

पणजी: ती जिवंत असती तर कुठेतरी स्वतःचा वाढदिवस साजरा करीत असती, ती सध्या आपल्यात नाही; त्यामुळे आम्हांला या ऐतिहासिक आझाद मैदानावर तिचा वाढदिवस साजरा करावा लागत आहे, असे सांगताना महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीना नाईक भावुक झाल्या, तशीच अवस्था सिद्धीच्या (Sidhi Naik) कुटुंबीयांची होती. तिची धाकटी बहीण सिमरन यावेळी धाय मोकलून रडत होती. तिचे वडील संदीप नाईक यांनीही सरकारच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले.

शुक्रवारी (ता.22) राज्य प्रदेश काँग्रेस आणि युवा काँग्रेसने सिद्धीचा वाढदिवस आयोजित केला होता. यावेळी तिला श्रद्धांजली वाहताना तिच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झालेच; पण काँग्रेसच्या नेत्यांनाही ते आवरता आले नाहीत. यावेळी प्रत्येकाने पोटतिडकीने सरकारवर हल्लाबोल केला. 12 ऑगस्ट रोजी सिद्धी नाईक हिचा संशयास्‍पद मृत्यू झाला होता. त्याच्या तपासाबाबत अनेक साशंकता व्यक्त केल्‍या जात आहेत. परंतु, पोलिसांकडून अद्याप खुलासा न झाल्याने राज्यभरात संताप आहे. तिला न्‍याय मिळावा या हेतूने शुक्रवारी आझाद मैदानावर तिचा प्रतीकात्मक वाढदिवस करून श्रद्धांजली वाहण्यातआली.

सुरुवातीला मेणबत्त्या प्रज्‍वलित करून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड, उदय मडकईकर, भरत माटोळकर, गोयलो फर्नांडिस, अल्मेडा फर्नांडिस, बीना नाईक यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सरकार या प्रकरणाबाबत का खुलासा करीत नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

सिद्धी ही गोमंतकीयांची लेक होती, तिच्या मृत्यूला दोन महिने होत आले तरी त्‍याबाबत सरकार निश्‍चितपणे काही खुलासा करीत नाही. सिद्धी नाईकने आत्महत्‍या केली नाही तर तो खूनच आहे. विशेष पथकाची स्थापना करून तात्काळ या प्रकरणाचा छडा सरकारने लावायला हवा. त्यात हयगय करू नका. आम्ही सिद्धीच्या कुटुंबीयांसमवेत आहोत.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

सिद्धीच्या मृत्यूनंतर आम्ही अनेकांचे उंबरे झिजवले, कुठेच न्याय मिळाला नाही. सरकार आम्हांला मदत करण्याऐवजी अन्याय करीत आहे. कोणी कपडे काढून आत्महत्या करील का? एवढेही या राज्यातील पोलिस खात्याला समजत नाही.

- संदीप नाईक, सिद्धीचे वडील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT