Siddhesh Naik Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat : जिल्हा पंचायतीच्या विकास आराखड्याचे 24 रोजी अनावरण : नाईक

दुर्गम भागातील शाळा दत्तक घेण्याचा प्रस्ताव

दैनिक गोमन्तक डिजिटल

मागील दोन वर्षांत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीद्वारे प्रत्येक मतदारसंघात सुमारे 60 लाखांची विकासकामे केली आहेत. पुढील वर्षभरात जी जिल्हा पंचायतीद्वारे कामे करण्यात येतील, त्यासाठी जिल्हा पंचायत विकास आराखडा तयार करणार असून या आराखड्याचे पंचायत राजदिनी म्हणजेच 24 एप्रिल रोजी अनावरण करणार असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी दिली.

ते जिल्हा पंचायतीच्या 14 व्या सर्वसाधारण बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी इतर जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी नाईक म्हणाले, या आराखड्यासंबंधी युवा संघ, स्वयंसाहाय्य गट, पंचायती यांचा सल्ला घेण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत सामुदायिक सभागृह, शाळांना लागणारे साहित्य, स्मशानभूमींचे नूतनीकरण आदी कामे केल्याचे त्यांनी सांगितले.

आराखड्यात प्रामुख्याने युवा, महिला, शिक्षण, पर्यावरण, समाज कल्याण आदी घटकांना प्राधान्य देणार असून राज्यातील सर्व पंचायती दिव्यांग सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या बैठकीत जि.पं.सदस्यांद्वारे मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केल्याचेही नाईक यांनी सांगितले.

आदर्श शाळा बनविणार

राज्यातील दुर्गम भागातील प्राथमिक शाळा, ज्या साधनसुविधांपासून वंचित आहेत, जेथे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे, वाहतुकीची सुविधा नाही, अशा शाळा जिल्हा पंचायतींच्या माध्यमातून विकसित करत आदर्श शाळा बनविण्याचा आमचा मानस आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे सिद्धेश नाईक यांनी सांगितले.

जिल्हा भवनसाठी अर्थसंकल्पात तरतूद

यंदाचा अर्थसंकल्प हा स्वयंपूर्ण आहे. जिल्हा पंचायतींसाठी पुरेपूर निधी दिला आहे. तसेच प्रशासकीय कामांसाठी 8 कोटींची तरतूद केली आहेत. तसेच जिल्हा भवनसाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जिल्हा पंचायतीच्या वतीने अभिनंदन करत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT