Viral Video Of Marathi Actor Siddharth Jadhav 
गोवा

Viral Video: 'फक्त हँडलच ठेवलाय', गोव्यात लँड होताच अभिनेता सिद्धार्थ जाधव विमान कंपनीवर संतापला

Viral Video Of Marathi Actor Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधव विमानाने मुंबईतून गोव्यात दाखल झाला, मात्र जेव्हा त्याने सामानाची बॅग पाहिली तर त्याची मोडतोड दिसून आले.

Pramod Yadav

Viral Video Of Marathi Actor Siddharth Jadhav

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने गोव्यातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. विमानतून उतरल्यानंतर सिद्धूने नामांकित विमान कंपनीच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ जाधव विमानाने मुंबईतून गोव्यात दाखल झाला, मात्र जेव्हा त्याने सामानाची बॅग पाहिली तर त्याची मोडतोड दिसून आले. यावरुन सिद्धार्थने विमान कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाला सिद्धार्थ?

गोवा विमानतळावर दाखल होताच सिद्धार्थ जाधवने एक व्हिडिओ शेअर केला. सिद्धार्थचे सामान असलेल्या बॅगची मोडतोड झाल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.

नमस्कार मी सिद्धार्थ जाधव, नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलोय. तुम्ही स्वत:च बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतलीय.

या लोकांनी माझ्या बॅगेचा फक्त हँडलच व्यवस्थित ठेवलाय. बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा. इंडिगो तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतलीये हे पाहून मला छान वाटलं, असे मिश्किलपणे बोलत सिद्धार्थने कंपनीच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला.

सिद्धार्थच्या या व्हिडिओ पोस्टवर अनेकांनी मत व्यक्त केले आहे. एकाने हा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा असून, अधिकृत तक्रार दाखल करणं आवश्यक असल्याचा सल्ला दिला. दुसऱ्या एकाने बॅगचे हाल पाहून माणंस शाबुत घेऊन या म्हणजे झालं, असे म्हणत भावा यापेक्षा तू एसटीने गेला असतास, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, विमान कंपनीने सिद्धार्थच्या या पोस्टची दखल घेत त्याला प्रितिक्रिया दिली. झालेल्या नुकसानाची माहिती देण्यासाठी त्याला नंबर देण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT