MAPUSA MUNICIPAL COUNCIL Dainik Gomantak
गोवा

Shubhangi Vaigankar : मुख्यमंत्र्यांनी पायउतार होण्यास सांगितल्यास राजीनामा देणार!

जर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास, आम्ही पक्षाच्या आदेशास बांधील असू, मात्र अद्याप असे काहीच झालेले नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी दिली. शनिवारी त्या म्हापसा येथे सांगितले.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितल्यास मी म्हापसा नगराध्यक्षपदाचा राजीनामा देईन. मात्र, अजून माझ्यापर्यंत कुठलेच निर्देश आलेले नाहीत. मुळात पालिकेत बदल होणार ही बातमी कुठून आली, याची मला कल्पना नाही.

जर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास, आम्ही पक्षाच्या आदेशास बांधील असू, मात्र अद्याप असे काहीच झालेले नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी दिली. शनिवारी त्या म्हापसा येथे सांगितले.

उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या आशीर्वादानेच आमचे म्हापसा पालिका मंडळ स्थापन झाले. त्यांचे आम्हांला बऱ्यापैकी सहकार्य मिळत आहे. तसेच जोशुआ यांनी मला नगराध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे, असे सांगितलेले नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री मला याविषयी फोन करतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, अजून कुणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असे स्पष्टीकरण म्हापसा नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी दिले.

अंतर्गत करारानुसार एका वर्षानंतर, तुम्ही व उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर हे पायउतार होणार होता? असा प्रश्न केला असता नगराध्यक्षा वायंगणकर म्हणाल्या, मुळात असे काहीच ठरलेले नव्हते. पक्षाने मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली व चांगले काम करुन दाखव, एवढेच सांगितले होते. त्या व्यतिरिक्त अन्य काहीच सांगितले नाही.

गणेश चतुर्थीनंतर सुद्धा बदल होणार नाहीत असा दावा करीत, या बातम्या निव्वळ अफवाच म्हणाव्या लागतील, असेही नगराध्यक्षा वायंगणकर यांनी पुढे नमूद केले. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या सहकार्यानेच म्हापसा पालिका मंडळ चांगले कार्य करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

SCROLL FOR NEXT