Ashtami Ferry : अष्टमीच्या फेरीच्या अर्जांचा घोळ संपला

अर्जांसाठी यंत्रणा; सुट्टी दिवशीही अधिकारी हजर
New application sale for Ashtami Ferry
New application sale for Ashtami FerryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : माडंवी तिरावर भरणाऱ्या अष्टमीच्या फेरीसाठी महापालिकेतर्फे विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या अर्जांचा झालेला घोळ शनिवारी संपुष्टात आला. सोमवारपासून अर्जांचा जो घोळ सुरू होता, त्यावर आमदार बाबूश मोन्सेरात यांनी अधिकाऱ्यांची केलेली कानउघाडणी कामी आली.

त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी रांगेत असलेल्या 75 विक्रेत्यांना टोकन दिले होते, त्यांच्याकडून शनिवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून नवे छपाई केलेले अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित रांगेत राहिलेल्यांना 75 पासून पुढील क्रमांक व अर्ज देण्यात आले. या सर्व प्रक्रियेवर आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांना उपस्थित राहून पोलिस बंदोबस्तात प्रक्रिया पार पाडावी लागली.

New application sale for Ashtami Ferry
CM Pramod Sawant : राज्य स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सहकार्य करा

महापालिका आयुक्त फर्नांडिस, मुख्य अभियंता विवेक पार्सेकर, लेखापाल सिद्धेश नाईक यांनी सकाळपासून अर्ज विक्री करण्याची प्रक्रिया पार पाडली. शनिवार असतानाही काही कर्मचाऱ्यांना पाचारण करून अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली, त्यासाठी महापालिकेच्या परिसरातील चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यालयात सुविधा उपलब्ध केली.

ज्यांच्याकडे टोकन आहे, त्यांनाच अर्ज मिळतील अशी तंबी आयुक्तांनी उपस्थित विक्रेत्यांना दिली. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने असलेल्या अनेक विक्रेत्यांना पोलिसांनी रांगेबाहेर काढले. फेरीबोटीजवळील क्रूसपासून ते कला अकादमीपर्यंत पदपथावर फेरीच्या दुकानांची पुन्हा आखणी केली गेली.

तत्पूर्वी महापालिकेतर्फे भरल्या जाणाऱ्या अष्टमीच्या फेरीसाठी सोमवारी अर्ज विक्री झाल्यानंतर त्यांचा काळाबाजार झाला. त्यामुळे कधी नव्हे तेवढी या प्रकारामुळे महापालिकेची बदनामी झाली. विक्रेत्यांचा आक्षेप हा अर्ज विक्रीत झालेला काळाबाजार असल्याचे स्पष्ट होते. कारण रांगेत उभे राहूनही अर्ज मिळाले नसल्याची त्यांची तक्रार न्याय्य होती.

बँकेकडे प्रक्रिया सुपूर्द करावी

महापालिकेतर्फे अष्टमीच्या फेरीच्या दुकान वाटपाची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी महापालिकेच्या दुकान विक्रीविषयी अर्जांचा घोळ झाला नाही. यावर्षीच तो कसा झाला? महापालिकेने व्यवसाय करणाऱ्याकडून व्यवसाय परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा लायसन्स यांच्या प्रति अनिवार्य कराव्यात. बँकेकडे प्रक्रिया दिल्यास सुरळीतपणे येऊन ते अर्ज स्वीकारले जातील.

- शेखर डेगवेकर, माजी चेअरमन, महापालिका बाजार समिती

वास्कोतील दामोदर उत्सवानंतर अनेक विक्रेते अष्टमीच्या फेरीत दुकाने थाटण्यासाठी येतात. अर्जांविषयी झालेला गोंधळ आता मिटला आहे. नव्याने सुरवातीपासून प्रक्रिया करून अर्ज विक्री करण्यात आली आहे. अर्जाची किंमत आहे तीच ठेवण्यात आली असून टोकन दिल्याप्रमाणे सर्व अर्ज दिले गेले आहेत.

- आग्नेल फर्नांडिस, आयुक्त

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com