Shrungi Bandekar wins 'Gold Medal' in Khelo India Vidyapeeth competition  Dainik Gomantak
गोवा

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत श्रुंगी बांदेकरला 'सुवर्णपदक'

पदकांमुळे श्रुंगीचा आत्मविश्वास उंचावला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याची प्रतिभाशाली जलतरणपटू श्रुंगी बांदेकर हिने बंगळूरमध्ये झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील जलतरणात बहारदार कामगिरी बजावली. तिने चार सुवर्ण व एका रौप्यसह एकूण पाच पदके जिंकली. या कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावला असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीत त्याचा फायदा होईल, असे तिने नमूद केले. (Shrungi Bandekar wins 'Gold Medal' in Khelo India Vidyapeeth competition)

श्रुंगी 18 वर्षांची आहे. तिची खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील कामगिरी लाजवाब ठरली. साहजिकच तिच्यावर प्रकाशझोत राहिला. ‘‘येथे जिंकलेल्या पदकांमुळे मला ओळख प्राप्त होण्यास मदत होईल. हे निकाल मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी लाभदायी ठरू शकतील. या वर्षी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचे आयोजन खूपच नेटके ठरले,’’ असे श्रुंगीने सफल कामगिरीविषयी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे लक्ष्य

श्रुंगीने राष्ट्रीय वयोगट-सीनियर जलतरण स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. या पातळीवर तिने तीसपेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. आता तिचे लक्ष्य आंतरराष्ट्रीय सहभागाचे आहे. ‘‘मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार होते, परंतु कोविड-19 मुळे संधी हुकली. आता मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहे आणि त्या ठिकाणीही पदके जिंकण्याचे ध्येय आहे,’’ असे श्रुंगी म्हणाली.

ऑलिंपियन नटराजकडून सल्ला

भारताचा ऑलिंपियन श्रीहर नटराज याने श्रुंगीला मौलिक सल्ला दिला आहे. त्याविषयी ती म्हणाली, ‘‘तो सुद्धा आमच्याच महाविद्यालयात शिकतो आणि माझा चांगला मित्र आहे. माझ्यासाठी तो प्रेरणादायी आहे आणि मी त्याच्याकडे आदर्श या दृष्टीने पाहते. सरावात खूप मेहनत घेण्याचा आणि आत्मविश्वासी राहण्याचा त्याचा सल्ला असतो. लक्ष्यप्राप्तीसाठी त्याग करावा लागतो असेही त्याने बजावले आहे.’’

जलतरणासाठी बंगळूरला

आपला भाऊ जलतरण करताना पाहून श्रुंगीही या खेळाकडे वळली. सुरवातीस तिच्यासाठी जलतरण फक्त मौजमजा होते, मात्र नंतर तिने याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरवात केली. राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी झाल्याने तिचा हुरूप वाढला, मेहनतीत वाढ झाली. केवळ जलतरणासाठी तिने मुक्काम बंगळूरला हलविला. तेथील जैन विद्यापीठात ती ‘बीकॉम’ पहिल्या वर्षात शिकते. जलतरणाचा सराव आणि अभ्यास यांची सांगड घालताना शिक्षकांची मदत होत असल्याचेही तिने सांगितले.

देशासाठी पदकाचे ध्येय

महान जलतरणपटू मायकल फेल्‍प्स श्रुंगीसाठी आदर्शवत आहे. आपल्या उद्दिष्टाविषयी ती म्हणाली, ‘‘एकदिवस भारतासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. त्यादृष्टीनेच माझा सराव सुरू आहे. पदकप्राप्ती माझ्यासाठी मोठे ध्येय आहे. यापूर्वी भारतीयांना शक्य झाले नाही, त्यामुळे आणखी कोणालाही शक्य होणार नाही असा अर्थ होत नाही. मी नेहमीच सकारात्मक आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित असते.’’

- 200 मीटर वैयक्तिक मेडली

- 50 मीटर बॅकस्ट्रोक

- 100 मीटर बॅकस्ट्रोक

- 200 मीटर बॅकस्ट्रोक

रौप्यपदक

- 400 मीटर वैयक्तिक मेडली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT