Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: उत्तर गोवा मतदारसंघाकरिता श्रीपादभाऊच!

मुख्यमंत्री : साखळीतील सभेत नाईक यांना निवडून आणण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Shripad Naik लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वेळ असला तरी भाजपमध्ये उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

यावर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा मतदारसंघाकरिता भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून श्रीपादभाऊच असतील, असे ठणकावून सांगितले.

श्रीपाद नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे जाहीर आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ते आज साखळीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान होतील. उत्तर गोव्याच्या जागेसाठी उमेदवारीकरिता सध्या राजकीय चर्चांना वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीचे तिकीट कुणाला द्यायचे, याचा निर्णय पक्षाच्या संसदीय समितीतर्फे होतो. त्यामुळे इतरांच्या दाव्याला कोणताच आधार असत नाही, असेही नाईक म्हणाले.

दरम्यान, आज, बुधवारी मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील जाहीर सभेत उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक हेच असतील आणि त्यांना बहुमताने निवडून आणा, असे रोखठोक आवाहन केल्याने भाऊंच्या उमेदवारीच्या दाव्याला बळ मिळाले आहे.

परुळेकरांचे ‘ते’ विधान अपरिपक्व

श्रीपाद नाईक यांना भाजपचे तिकीट न मिळाल्यास आपण लोकसभा तिकिटाचा दावेदार असल्याचे माजी मंत्री दिलीप परूळेकर यांनी म्हटल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते.

यावर आज नाईक यांनी जोरदार हल्ला चढवत उत्तर गोव्याच्या उमेदवारीकरिता आपण प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट केले. या जागेबाबत केली जाणारी विधाने ही अपरिपक्व आणि पोरकट आहेत, असाही टोला त्यांनी हाणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT