Goa Drugs Case: ड्रग्सप्रकरणी जेरी आलेक्सविरोधात आरोप निश्‍चितीचा आदेश

पोलिसांनी संशयित जेरी आलेक्स याला ड्रग्जसह ताब्यात घेतले.
Drug Case
Drug Case Gomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Drugs Case : कांदोळी येथील जेरी आलेक्स याला ड्रग्जप्रकरणी पोलिस खात्याच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाने दाखल केलेल्या आरोपपत्रावरील सुनावणीवेळी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचा आदेश दिला. त्याने या आरोपपत्रालाच न्यायालयात आव्हान दिले होते.

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी संशयित जेरी आलेक्स याला ड्रग्जसह तो राहत असलेल्या खोलीमध्ये ताब्यात घेतले होते.

तसेच या ड्रग्ससंदर्भातचा अहवाल तसेच तो राहत असलेली खोली भाडेपट्टीवर घेतली होती याचे पुरावे पाहता त्याने ड्रग्स बाळगल्याप्रकरणी आरोप निश्‍चित करण्यासाठी ते पुरेसे आहेत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Drug Case
IPL 2023: धोनीच्या CSK चा सुपर 'विजय', दिल्ली कॅपिटल्स Play Off च्या शर्यतीतून बाद?

पोलिस पथक 20 सप्टेंबर 2021 रोजी रात्रीच्यावेळी शिवोली येथे वाहनाने गस्तीवर असताना पोलिस उपनिरीक्षक रोहन मडगावकर याला माहिती मिळाली की, आफ्रिकन नागरिकासारखा दिसणारा एक तरुण कांदोळी येथे राहत असून त्याने खोलीमध्ये ड्रग्स लपविला आहे. ही खोली त्याने संजीव वेर्लेकर याच्याकडून भाडेपट्टीवर घेतली आहे.

Drug Case
Goa Murder Case: अनैतिक संबंधांच्या रागातून पत्नीचा खून

त्यानुसार या पथकाने खोलीवर छापा टाकला असता त्याच्याकडून 4.18 ग्रॅम एलएसडी द्रव्य पदार्थ असलेली बाटली सापडली होती. त्यातील द्रव्याची ड्रग्स चाचणी किट बॉक्सतर्फे तपासणी केली असता ते ड्रग्स असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी याप्रकरणी तपास करून संशयित जेरी आलेक्स याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

Drug Case
Uorfi Javed: उर्फी जावेदचा नवा कारनामा ! असा केला लूक की युजर्स म्हणाले- हा तर...

त्याच्याजवळ सापडलेला ड्रग्स त्याचा नसल्याचा दावा केला होता. मात्र, खोली मालकाने दिलेल्या जबानीनुसार त्याने ती खोली १० हजार रुपयांच्या भाडेपट्टीवर घेतल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे न्यायालयाने या पुराव्याचा आधार व त्याने दिलेले आव्हान फेटाळत आरोप निश्‍चित करण्याचा आदेश दिला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com