Goa Stampede Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: लईराई देवीच्या जत्रेत आर्थिक उलाढालीला फटका! 30 ते 35 टक्के परिणाम; व्यावसायिकांना तोटा

Shirgao Lairai Jatrotsav: शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेतील आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला असून व्यावसायिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेतील आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला असून व्यावसायिकांना फटका बसल्याचा अंदाज आहे. यंदा आर्थिक उलाढालीवर ३० ते ३५ टक्के परिणाम झाल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली आहे. जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आर्थिक कमाईवर परिणाम झाला, असे एक रस विक्रेता शहाजी पाटील यांनी सांगितले.

कोविड’ महामारी काळ सोडल्यास खाणबंदीनंतर आणि वाढत्या महागाईचा आतापर्यंत जत्रेच्या आर्थिक उलाढालीवर कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही. उलट दरवर्षी आर्थिक उलाढाल वाढत असते.

सध्याच्या घडीस या जत्राकाळात होणारी आर्थिक उलाढाल एक कोटीच्या घरात पोचत आहे. जत्रा ते कौलोत्सव मिळून किमान पाच दिवस धंदा तेजीत चालत असतो. यंदा मात्र स्टॉल लवकर काढावे लागल्याने व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम होताना आर्थिक कमाईही कमी झाली.

कमालीची शांतता

शिरगावातील जत्रोत्‍सवाची सांगता झाली असली तरी झालेल्या चेंगराचेंगरीची भयानकता अजूनही अनेकांच्या डोळ्यांसमोर तरळत आहे. जत्रा आणि कौलोत्सवाला यायला मिळाले नाही, ते भाविक आता शिरगावात येत आहेत. आजही गोव्याबाहेरील काही भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र सर्वत्र चर्चा अजूनही दुर्घटेबाबतच सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT